Wednesday, March 12, 2025
Home बॉलीवूड ‘माझ्या पतीवर अवलंबून…’ प्रियांका चोप्राने केले कुटुंब आणि दैनंदिन जीवनाबद्दल मोठे वक्तव्य

‘माझ्या पतीवर अवलंबून…’ प्रियांका चोप्राने केले कुटुंब आणि दैनंदिन जीवनाबद्दल मोठे वक्तव्य

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आणि देसी गर्ल म्हणून प्रियांका चोप्राला ओळखले जाते. प्रियांकाने तिच्या प्रतिभेच्या जोरावर जागतिक ओळख मिळवली आहे. तिने हॉलिवूडमध्ये देखील मोठे नाव कमावले आहे. देसी गर्ल असणाऱ्या प्रियांकाला आज यशाची ग्यारंटी म्हणून ओळखले जाते. सध्या प्रियांका अमेरिकेमध्ये तिचा नवरा निक जोनास आणि मुलगी मालतीसोबत आलिशान जीवन जगत आहे. ती तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यात खूप सुखात आहे. नुकताच प्रियांकाने काम आणि आयुष्याचा समतोल साधण्याबाबत खुलासा केला आहे.

प्रियांका (Priyanka Chopra) म्हणाली की, ”मी माझ्या पतीवर अवलंबून आहे. तुमच्या जोडीदारासोबत आणि तुमच्या कुटुंबासोबत समतोल राखणे खूप महत्त्वाचे आहे. जेणेकरून बाकीच्या वाईट भावनांवर मात करता येईल. मी माझ्या नवर्‍यावर अवलंबून होतो. पण जेव्हा मी ‘सिटाडेल’ वेब सिरीजचे शूटिंग करत होते, तेव्हा निक मला भेटायला आला होता. त्यामुळेच वर्क-लाइफ बॅलन्स खरोखरच महत्त्वाचा आहे.’

पुढे बोलताना ती म्हणाली, “हेच माझे करिअर आहे आणि मी हेच जीवन जगण्यासाठी करते. पण महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी वेळ काढण्याची तयारी असणे देखील महत्त्वाचे आहे. नेहमी काम करताना स्वत: साठी वेळ काढनं म्हत्वाच आहे.” प्रियांका नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये गाजत असते.

प्रियांका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती आगामी काळात ‘सिटाडेल 2’, ‘हेड्स ऑफ स्टेट’मध्ये दिसणार आहे. प्रियांका सिटाडेलनंतर बाॅलिवूड चित्रपटांमध्ये परतणार आहे. प्रियांका पुढे फरहान अख्तरच्या ‘जी ले जरा’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कॅटरिना कैफ आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

अधिक वाचा- 
‘मैं जट यमला’ वर नातू करण देओलसोबत धर्मेंद्र यांनी केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच
मोनालिसाच्या ‘त्या’ अंधारातील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले… 

हे देखील वाचा