Sunday, April 14, 2024

‘मैं जट यमला’वर नातू करण देओलसोबत धर्मेंद्र यांनी केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच

सनी देओलचा मुलगा करण देओल उद्या म्हणजेच 18 जून रोजी लग्न बंधनात अडकणार आहे. अशात देओल कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. करण आणि त्याची मंगेतर द्रिशा आचार्य यांचा काल म्हणजेच 16 जून रोजी संगीत सोहळा झाला. यावेळी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी सहभागी झाले होते.

फंक्शनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल हाेत आहेत, अशात एका व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये धर्मेंद्र नातवाच्या लग्नाबद्दल खूप आनंदी दिसत आहेत. यासाेबतच संगीत सेरेमनीमध्ये धर्मेंद्र करण आणि राजवीर एकत्र डान्स करताना दिसत आहेत, ज्याला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

करण देओलच्या संगीत सोहळ्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये धर्मेंद्र त्यांच्या सुपरहिट गाण्यावर सिग्नेचर स्टेप करताना दिसत आहेत. यावेळी धर्मेंद्रसोबत त्यांचे दोन्ही नातू करण आणि राजवीर देओलही डान्स करताना दिसत आहेत. खरे तर, करण आणि राजवीर आजोबांच्या डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहेत. अशात आजोबा-नातूची ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच हिट होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

माध्यमातील वृत्तानुसार, सनी देओलचा मुलगा करण देओल उद्या म्हणजेच 18 जूनला लग्न करणार आहे. करण दिग्दर्शक बिमल रॉय यांची नात द्रीशा आचार्यसोबत लग्न करत आहे. या लग्नात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये जॅकी श्रॉफपासून अमिताभ बच्चन, अनिल कपूर, पूनम धिल्लन, अमृता सिंग यांच्यासह संपूर्ण कुटुंबाच्या नावांचा समावेश आहे.(bollywood actor sunny deol son karan deol dance with grandfather dharmendra in yamla pagla deewana song on sangeet ceremony video goes viral )

अधिक वाचा-
आदिपुरुषची ‘जानकी’ सार्वजनिक ठिकाणी करत होती स्मोकिंग, क्रिती सेनाॅने सांगितला ‘तो’ किस्सा
मोनालिसाच्या ‘त्या’ अंधारातील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले…

हे देखील वाचा