Thursday, June 13, 2024

मोनालिसाच्या ‘त्या’ अंधारातील व्हिडिओने वेधले चाहत्यांचे लक्ष; व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले…

भोजपूरी इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे मोनालिसा होय. मोनालिसा सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिच्या बोल्ड फोटोंनी चाहत्यांचे होशा उडवत असते. मोनालिसा केवळ तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जात. तसेच ती तिच्या ग्लॅमरस लुक्सनेही चाहत्यांची मन जिंकत असते. त्यामुळे ती खूप चर्चेत असते. मोनालिसा अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांसह फोटो आणि व्हिडिओ शेअर करताना दिसते. अलीकडेच मोनालिसाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मोनालिसा अनेक वेळा नकारात्मक भूमिका करताना दिसते. पण मोनालिसा प्रत्येक पात्रात जीव ओतून काम करते. अभिनेत्री मोनालिसा (Monalisa) तिची सर्व कामे मोठ्या उत्साहाने करते. लोकांनाही तिचा अभिनय खूप आवडतो. मोनालिसाचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तिचे चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर लाईक आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

मोनालिसाने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तिला पाहून सर्वांना ‘मंजुलिका’ची आठवण झाली आहे. व्हिडिओमध्ये मोनालिसा पूर्णपणे बंगाली लूकमध्ये दिसत आहे. कपाळावर मोठा टिकली, कानात मोठे झुमके आणि काळे लांबसडक केस. या लूकमध्ये मोनालिसा खूप सुंदर दिसत आहे. त्याचवेळी मोनालिसा रात्रीच्या अंधारात झाडांभोवती फिरताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

 मोनालिसाचा हा लूक पाहून चाहते यावर भन्नाट कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले की,”भूत”, दुसऱ्याने लिहिले की, ‘मंजुलिका’ तर काहींनी हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. तसेच तिच्या सौदर्याचे देखील चाहते तोंंड भरून कौतुक करत आहेत. दरम्यान, मोनालिसाही तिच्या पतीसोबत खूप व्हिडिओ बनवत असते. व्हिडिओमध्ये तिची आणि तिच्या नवऱ्याची केमिस्ट्री स्पष्ट दिसते. मोनालिसाने तिचा अभिनय प्रवास भोजपुरी चित्रपटातून सुरू केला आहे. (Bhojpuri actress Monalisa’s video goes viral)

अधिक वाचा-
आदिपुरुषची ‘जानकी’ सार्वजनिक ठिकाणी करत होती स्मोकिंग, क्रिती सेनाॅने सांगितला ‘तो’ किस्सा
हृतिक रोशनच्या ‘या’ चित्रपटात कियारा अडवानीची एन्ट्री, ज्युनियरसोबत करणार स्क्रीन शेअर 

हे देखील वाचा