Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

प्रियांकाचा एक्स बॉयफ्रेंडविषयी खळबळजनक खुलासा; लाज न बाळगता म्हणालेली, ‘ब्रेकअपनंतरही…’

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा कारकीर्दीच्या शिखरावर पोहोचली आहे. खूप कमी अभिनेत्रींना एका इंडस्ट्रीत यश मिळवल्यानंतर दुसऱ्या इंडस्ट्रीतही यश मिळाले आहे. यामध्ये प्रियांकाच्या नावाचाही समावेश होतो. जगभरात अभिनयाचा डंका वाजवणारी प्रियांका तिच्या वैयक्तिक आयुष्यातही खूपच बोल्ड आहे. विशेष म्हणजे, प्रियांका प्रश्नांची उत्तरेदेखील बेधडकपणे देत असते. असेच तिने एका शोदरम्यान मोकळेपणाने खासगी प्रश्नाचे उत्तर दिले होते

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिने ‘कॉफी विथ करण 6’ शोमध्ये खासगी प्रश्नाचे उत्तर दिले होते. या शोमध्ये प्रियांका करण जोहर (Priyanka Chopra) याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देताना दिसत आहे.

या शोमध्ये एक सेगमेंट आहे, ज्याला ‘शॉट्स राऊंड’ असे म्हटले जाते. यामध्ये प्रियांकाला जेव्हा करणने तिच्या एक्स बॉयफ्रेंडशी संबंधित खासगी प्रश्न विचारले, तेव्हा प्रियांकाने न लाजता तिच्या अफेअरविषयी भाष्य केले. करणने तिला विचारले की, ब्रेकअपनंतर तिने एक्सला किस (Kiss) केले आहे का? यावर प्रियांकाने ‘हो’ म्हणत उत्तर दिले होते. यादरम्यान, ब्रेकअपनंतरही प्रियांकाने तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोनवर कामुक संवाद केल्याचे कबुल केले. म्हणजेच ब्रेकअपनंतरही प्रियांका तिच्या बॉयफ्रेंडच्या संपर्कात होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाबद्दल बोलायचं झालं, तर ती यावर्षीच आई बनली आहे. तसेच, ती दरदिवशी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर लेक मालती (Malti) आणि पती निक जोनास (Nick Jonas) यांच्यासोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. प्रियांका नुकतीच भारतात आली होती. यादरम्यान तिने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, जे भलतेच व्हायरल झाले होते. यादरम्यान प्रियांका उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या हिंसा आणि भेदभाव संपवण्यासाठी युनिसेफ आणि त्यांच्या सहयोगींद्वारे केली जाणारी कामे पाहण्यासाठी लखनऊच्या एका फिल्ड ट्रीपवरही गेली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

अभिनेत्रीच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर ती लवकरच ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. (actress priyanka chopra shocking revelation about ex boyfriend read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
युट्यूबर अरमानच्या दुसऱ्या पत्नीचा खळबळजनक खुलासा! एकत्र प्रेग्नंट होण्याविषयी म्हणाली, ‘आमच्यात फक्त…’
भारतातच नाही, तर ‘अवतार 2’चा डंका जगभरात; दोनच दिवसात केली ‘छप्परफाड’ कमाई

हे देखील वाचा