Thursday, November 30, 2023

भारतातच नाही, तर ‘अवतार 2’चा डंका जगभरात; दोनच दिवसात केली ‘छप्परफाड’ कमाई

हॉलिवूडमध्ये असे काही सिनेमे आहेत, जे प्रेक्षकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडत नाहीत. जगभरात  रिलीज होणारे हे सिनेमे साधी सुधी नाही, तर बक्कळ कमाईदेखील करतात. असाच एक हॉलिवूड सिनेमा सध्या चर्चेत आहे. तो सिनेमा म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा ‘अवतार 2‘ होय. बहुप्रतिक्षित ‘अवतार 2’ हा सिनेमा 13 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर 16 डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

विशेष म्हणजे, ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्यामुळेच या सिनेमाच्या कमाईचा आकडादेखील वेगाने वाढत आहे. सध्या भारतीय बॉक्स ऑफिससोबतच ‘अवतार 2’ (Avatar 2) हा सिनेमा जगभरात कमाईचा डंका वाजवत आहे.

जगभरात ‘अवतार 2’ने किती कमाई केली?
रिलीजनंतर अवघ्या दोनच दिवसात भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 80 कोटींचा गल्ला जमवणारा ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ (Avatar The Way of Water) हा सिनेमा जागतिक स्तरावरही हा सिनेमा चांगलीच कमाई करत आहे. या सिनेमाने जगभरात आतापर्यंत 1500 कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. यासोबतच भारतातही या सिनेमाने सर्व भाषांमध्ये एकूण 100 कोटींची कमाई केली आहे.

ही आकडेवारी पाहिल्यानंतर असे म्हटले जाऊ शकते की, ‘अवतार 2’ सिनेमाच्या निर्मात्यांसाठी 13 वर्षांची तपश्चर्या प्रभावी ठरली. इंग्रजी भाषेव्यतिरिक्त ‘अवतार 2’ हा सिनेमा भारतात हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये कमाईचे नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. या सिनेमाच्या कमाईवरून असा अंदाज लावला जाऊ शकतो की, या सिनेमाने पहिल्या वीकेंडला जबरदस्त कमाई केली असेल.

पहिल्या दोन दिवशीचे ‘अवतार 2’चे कलेक्शन
भारतीय बॉक्स ऑफिसवर ‘अवतार 2’ या सिनेमाने रिलीजनंतर आपली छाप सोडली आहे. पहिल्याच दिवशी ‘अवतार 2’ने 41 कोटी रुपयांची कमाई केली होती. तसेच, दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवारी या सिनेमाने 42 ते 43 कोटी रुपयांची कमाई केली.

‘अवतार 2’च्या बजेटविषयी बोलायचं झालं, तर या सिनेमाच्या निर्मितीसाठी तब्बल 2800 कोटींहून अधिक रुपये खर्च करण्यात आले आहेत. आता हा सिनेमा किती रुपये कमावतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दीपिकाचा प्रसिद्ध अभिनेत्यावर होता क्रश; झोपण्यापूर्वी करायची ‘हे’ काम
प्रसिद्ध अभिनेत्रीने भगवी बिकिनी घालून समुद्रात लावले ठुमके; नेटकरी म्हणाले, ‘लाज वाटू दे जरा’

हे देखील वाचा