सन २००३पासून अभिनयक्षेत्रात काम करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने आज यशाचे शिखर गाठले आहे. प्रियांकाने तिच्या अभिनयाने बॉलिवूड ते हॉलिवूड असा सुरेख प्रवास केला आहे. ती हल्ली बॉलिवूडमध्ये कमी आणि हॉलिवूड सिनेमात जास्त पाहायला मिळते. याव्यतिरिक्त ती तिच्या सिनेमांसोबतच वैयक्तिक कारणांमुळेही चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते. तिला इंस्टाग्रामवर तब्बल ८ कोटींहून अधिक चाहते फॉलो करतात. कदाचित त्यामुळेच तिच्या प्रत्येक पोस्टला लाखो लाईक्स मिळतात. अशात तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत प्रियांका एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे.
अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिचा व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ पाहून प्रत्येकजण हैराण झाला आहे. कारण, प्रियांकाने या व्हिडिओत असे काही केले आहे, कदाचित ज्याचा कुणी विचारही केला नसेल.
स्विमसूट परिधान करून प्रियांकाने लावले ठुमके
प्रियांकाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये ती तिच्या लॉस एंजेलिसमधील घरात मुलगी मालती आणि पती निक जोनास यांच्यासोबत दिसली होती. या फोटोत प्रियांकाने तिच्या मुलीचा फोटो लपवला होता. आता तिचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये ती बाथरूममध्ये स्विमसूट परिधान करून ठुमके लावताना दिसत आहे. प्रियांकाने या व्हिडिओत काळ्या रंगाचे स्विमसूट परिधान केले आहे, जे तिच्यावर खूपच सुंदर दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे.
View this post on Instagram
प्रियांकाविषयी थोडक्यात
प्रियांका ही आता भारतात नाही, तर अमेरिकेत राहते. ती निक जोनास याच्यासोबत लग्न केल्यानंतर अमेरिकेत शिफ्ट झाली. ती तिच्या सिनेमांसाठी कधीकधी भारतात येत असते. प्रियांका शेवटची ‘द स्काय इज पिंक’ या बॉलिवूड सिनेमात झळकली होती. त्यानंतर ती ओटीटीवरील ‘द व्हाईट टायगर’ या सिनेमातही दिसली होती. त्यानंतर ती बॉलिवूडपासून दूर झाली. ती सध्या हॉलिवूड सिनेमात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवताना दिसत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
देशाचा अभिमान आहे रणवीर सिंगची मेहुणी, भल्याभल्या अभिनेत्रींनाही पछाडण्याचा राखते दम
आवरा रे! फक्त ३ नाड्यांनी बांधलेल्या ड्रेसमध्ये नोराने दिल्या एकापेक्षा एक पोझ, व्हिडिओ भन्नाट व्हायरल
पावसात भिजत नीलम गिरीने वातावरण केलं गरम, अभिनेत्रीच्या काळ्या रंगाच्या साडीतील डान्सने चाहत्यांनाही भुरळ