काळानुसार ट्रेंडही बदलत असतात. सुरुवातीला रुपेरी पडद्यावर बोल्ड आणि इंटीमेट सीन्स जास्त प्रमाणात दाखवले जात नसायचे. मात्र, जसा काळ बदलला, तसा या गोष्टींचा सिनेमात समावेश केला जाऊ लागला. अशा सीन्समुळे कलाकारांना वादाच्या भोवऱ्यातही अडकावे लागले आहे. यामध्ये अभिनेत्री राधिका आपटे हिचाही समावेश आहे. राधिकाला तिच्या भूमिकेसोबत कोणत्याही प्रकारचा अन्याय करणे आवडत नाही. स्क्रिप्टच्या मागणीनुसार ती आपले १०० टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करते. मात्र, यामुळे तिला एकदा वादाचाही सामना करावा लागला होता.
प्रतिभावान अभिनेत्री आहे राधिका
अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिने आतापर्यंत शानदार सिनेमे आणि वेबसीरिजमध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. त्यात ‘लस्ट स्टोरीज’, ‘घोल’, ‘पार्च्ड’, ‘अंधाधून’, ‘सेक्रेड गेम्स’ यांसारख्या सिनेमा आणि वेबसीरिजचा समावेश आहे.
सिनेमातील न्यूड सीन झालेला लीक
राधिका ही बेधडक आणि बिनधास्त अभिनेत्री आहे. ती कोणत्याही विषयावर आपले परखड मत व्यक्त करत असते. असेच तिने माध्यमांशी बोलताना सिनेमातील लीक झालेल्या न्यूड सीनबद्दल मोकळेपणाने चर्चा केली होती. तिने सांगितले होे की, “हा व्हिडिओ माझ्या ‘क्लीन शेव’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचा होता. जेव्हा मला व्हिडिओबद्दल समजले, त्यावेळी मी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. मात्र, जसे मला याबाबत समजले, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्या घटनेने माझ्यावर मोठा परिणाम झाला होता.”
चार दिवस घरात बंद होती राधिका
राधिकाने पुढे बोलताना सांगितले की, “मला सुरुवातीला मीडिया ट्रोलिंगचा त्रास झाला नाही, पण जेव्हा माझा ड्रायव्हर, वॉचमन आणि स्टायलिस्टच्या ड्रायव्हरने मला फोटोमध्ये ओळखले, त्यामुळे मला लाज वाटू लागली. मी घराबाहेर पडणे बंद केले. मी चार दिवस स्वतःला घरात कोंडून घेतलं आणि नंतर मला वाटलं की, हा वेळेचा अपव्यय आहे आणि त्यासाठी तुम्ही काहीही करू शकत नाही.”
विवाहित आहे राधिका
“त्या हुशार लोकांना माझे वादग्रस्त फोटो पाहून अंदाज आला असेल की, ती मी नाही. त्याचवेळी जेव्हा मी पार्च्ड चित्रपटासाठी न्यूड सीन दिला, तेव्हा मला जाणवले की आता लपवण्यासारखे काही उरले नाही,” असेही राधिका पुढे बोलताना म्हणाली. राधिकाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर ती विवाहित आहे. लंडनमधील प्रसिद्ध संगीतकार बेनेडिक्ट टेलरशी तिने २०१२ साली लग्न केले होते. मात्र, त्यांना अद्याप एकही अपत्य नाहीये.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
प्रसिद्ध दिग्दर्शक हरपला! ब्लॉकबस्टर ‘बालिका वधू’ सिनेमाची निर्मिती करणारे मजूमदार काळाच्या पडद्याआड
प्लेबॅक सिंगर नाही, तर वेगळंच होतं जावेद अलीचं स्वप्न, खास व्यक्ती गमावल्याने बदलले नाव
Khuda Haafiz 2 | रिलीझसाठी सज्ज झालाय चित्रपट, पण रिलीझपूर्वीच निर्मात्यांना मागावी लागली माफी