×

गोविंदाच्या गाण्यावर ‘देसी गर्ल’ भाचीने लावले जोरदार ठुमके आणि उघड केलं मोठं रहस्य

प्रख्यात फिल्म अभिनेता गोविंदाची (Govinda) भाची आणि अभिनेत्री रागिनी खन्ना (Ragini Khanna) आपल्या प्रशंसकांना सोशल मीडियावर सतत खास अपडेट्स देत असते. रागिनीने आधी चाहत्यांपुढे जाहीर केले, की ती ‘देसी गर्ल’ आहे. त्यानंतर शुक्रवारी (२९ एप्रिल) तिने एक मोठं रहस्य उघड केलं.

‘जागतिक नृत्य दिन’ अर्थात ‘वर्ल्ड डान्स डे’च्या निमित्ताने रागिनी खन्नाने आपल्या सोशल मीडिया अकांउटच्या माध्यमातून एक व्हिडिओ पोस्ट केला. यात ती आपला मामा गोविंदाच्या प्रसिद्ध गाण्यावर जबरी ठुमके लावते आहे. ‘मेरे प्यार का रस जरा चखणा.. ओए मखणा..’ हेच ते गाणं!

रागिनी खन्नाने स्वदेशी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ ऍपवर आपल्या अधिकृत हॅंडलद्वारे एक व्हिडिओ पोस्ट केला. हा व्हिडिओ जागतिक नृत्य दिनाला अर्पण करत तिने लिहिले, “मी प्रामाणिकपणे कबूल करते, माझं कुटुंब नाचण्याचं अतिशय शौकीन आहे. आमच्या घरातल्या सगळ्या पार्ट्यांमध्ये आम्ही प्रचंड उत्साहाने नाचतो. या जागतिक नृत्य दिनी मी आपली भाची ट्विंकलच्या ५व्या वाढदिवशी आपला आवडता डान्स पार्टनर आशुतोषच्या गोविंदाच्या गाण्यावर घरामध्ये केलेली मस्ती शेअर करतो. यात आम्ही (गाण्याच्या व्हिडिओनुसार) ओरिजनल स्टेप्स आणि भाव कॉपी करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

यावर क्लिक करून पाहा व्हिडिओ

या ४९ सेकंदांच्या व्हिडिओ क्लिपमध्ये रागिनी आणि आशुतोष ‘बड़े मियां-छोटे मियां’ सिनेमाचं लोकप्रिय गाणं ‘मेरे प्यार का रस जरा चखणा.. ओए मखणा…’वर एकदम फर्स्टक्लास परफॉर्म करत आहेत. गोविंदा, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि माधुरी दीक्षितच्या (Madhuri Dixit) अभिनयाने सजलेल्या या गाण्याला जबरदस्त लोकप्रियता मिळाली होती. आजही हे गाणं बऱ्याचदा डीजेवर वाजत असते. या गाण्यातला धमाल मस्तीचा मूड कायम रहावा याचीही खबरदारी गोविंदाच्या भाचीने घेतली. गाण्याच्या शेवटी रागिनीची सिग्नेचर स्माइल अर्थात तिच्या हास्याने यात एकदमच चार चांद लावले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post