×

DIDLil Masters | ‘तुझको मिर्ची लगी तो…’, गोविंदासोबत थिरकली मौनी, दाखवले करिश्माचे मुव्ह्ज!

प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स’चा (DIDLilMasters) नवीन सीझन लवकरच सुरू होणार आहे. ‘डीआयडी लिटल मास्टर्स’ रविवारपासून (२४ एप्रिल) टीव्हीवर प्रसारित होणार आहे. या शोमध्ये रेमो डिसूझा (Remo D’souza), सोनाली बेंद्रे (Sonali Bendre) आणि मौनी रॉय (Mouni Roy) जज म्हणून दिसणार आहेत. अशातच, शोच्या सेटवरून अभिनेता गोविंदा (Govinda) आणि मौनीच्या डान्सचा एक रोमांचक व्हिडिओ समोर आला आहे.

केला धमाकेदार डान्स
खरंतर रविवारपासून हा शो टीव्हीवर सुरू होणार आहे. पण शोचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे. दरम्यान निर्माते शोचे लेटेस्ट प्रोमो व्हिडिओ शेअर करत आहेत. अशातच आता अभिनेत्री मौनी रॉयने शोचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता गोविंदा पाहुणा म्हणून येणार आहे. व्हिडिओमध्ये गोविंदा आणि मौनी रॉय ‘DIDLilMasters’च्या मंचावर धमाकेदार डान्स करताना दिसत आहेत. (mouni roy danced fiercely with govinda on the iconic song)

मौनी रॉयने केला गोविंदाच्या गाण्यावर डान्स
शोमध्ये मौनी रॉय गोविंदासोबत त्याच्या ‘तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं’ या आयकॉनिक गाण्यावर जबरदस्त मूव्ह्ज दाखवताना दिसत आहे. गोविंदासोबत डान्स करताना मौनी करिश्मा कपूरच्या (Karisma Kapoor) काही स्टेप्सही करताना दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

दिले ‘असे’ कॅप्शन
हा व्हिडीओ शेअर करत मौनी रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “हा माझा बॉलीवूड हिरो नंबर सोबतचा सर्वोत्तम क्षण आहे.” हा व्हिडिओ चाहत्यांमध्येही खूप पसंत केला जात आहे. म्हणूनच यावर त्यांचे लाईक्स आणि प्रतिक्रिया भरभरून आलेल्या दिसत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post