सोशल मीडिया हे अभिव्यक्त होण्याचे प्रभावी व्यासपीठ आहे. प्रत्येकजण आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. यात ‘शालू’ म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या आघाडीच्या अभिनेत्रीपैकी एक आहे. दररोज न चुकता ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसाठी तिचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करत असते. राजेश्वरीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
राजेश्वरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती एक अभिनय करताना दिसत आहे. यात तिने रिलेशनशिपमध्ये असल्यावर आणि सिंगल असल्यावर काय होते हे दाखवले आहे. यात जेव्हा मुली रिलेशनमध्ये असतात, तेव्हा खूप रडत असतात. पण नंतर ती अभिनयातून असे सांगत आहे की, बरं झालं माझ्यासोबत असं काही होत नाही. या दोन्हीही भूमिका तिनेच साकारल्या आहेत. (Actress Rajeshwari kharat’s video viral on social media)
हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “थॅंक गॉड.” या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला ‘प्यार बडी बुरी चीज है’ हे गाणे वाजत आहे.
नेहमी प्रमाणेच तिच्या या व्हिडिओला तिचे चाहते भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत. राजेश्वरीची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. ती तिच्या चित्रपटापेक्षा सोशल मीडियावर जास्त लोकप्रिय आहे. चाहता वर्ग मोठा असल्याने तिची कोणतीही पोस्ट शेअर करता क्षणी व्हायरल होत असते.
राजेश्वरीला तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून अनेक वेळा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काहींना तिचा अंदाज आवडतो, तर काहींना आवडत नाही. परंतु चुकीच्या कमेंटला राजेश्वरीने सडेतोड उत्तर देखील दिले आहे.
राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या ‘फँड्री’ या चित्रपटातून तिच्या करिअरला सुरुवात केली. या एकाच चित्रपटाने तिला भरभरून ओळख दिली. त्यानंतर तिने ‘आयटमगिरी’ या चित्रपटात काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘यार गजब आहेस तू’, श्रुती मराठेच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची झक्कास कमेंट
-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’