‘गाढवाचे लग्न’ सिनेमातील गावरान ‘गंगा’ झाली ग्लॅम डॉल, पाहा तिचे ग्लॅमरस फोटो


अनेकदा कलाकार पडद्यावर अथवा स्क्रीनवर ज्या भूमिका निभावतात तसेच कलाकार त्यांच्या खऱ्या आयुष्यात असतात असाच अनेकांचा समाज किंबहुना गैरसमज असतो. एखाद्या कलाकाराची एक भूमिका खूप गाजली तर ती भूमिका करणारे कलाकार त्याच्या रियल जीवनातही तसेच असतील असेच बऱ्याच लोकांना वाटते. मात्र हा त्यांच्या चुकीचा समज असतो. कलाकार पडद्यावर किंवा टीव्हीवर जरी सध्या, सालस, खेडेगावातील भूमिका साकारत असले तरी ते त्यांच्या खऱ्या आयुष्यात मॉडर्न आणि ग्लॅमरस असू शकतात किंवा असतातच. आता अभिनेत्री राजश्री लांडगेचेच घ्या.

rajshree landge
Photo Courtesy: Facebook/rajshree landge

राजश्री लांडगे तिच्या ‘गाढवाचे लग्न’ या चित्रपटासाठी ओळखली जाते. या सिनेमात राजश्रीने साकारलेली ‘गंगी’ लयी भाव खाऊन गेली. मकरंद अनासपुरे यांची बायको असणारी ही गंगी अतिशय कडक, नवऱ्यावर जीव असण्यासोबतच सतत त्याच्यावर नजर ठेवायची आणि त्याला आपल्या मुठीत ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे. अशी ही गंगी तिची बोलण्याची ढब, तिचे एक्सप्रेशन, तिचा कडक गावरान आवाज, गावरान लहेजा आणि तिचा लूक आजही प्रेक्षकांच्या स्पष्ट लक्षात आहे.

‘गाढवाचे लग्न’ हा २००७ साली आलेला सिनेमा राजश्रीसाठी आणि तिच्या करिअरसाठी खूप महत्वाचा आणि आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. सावल्या कुंभाराची खेडेगावातील बायको साकारलेल्या राजश्रीमध्ये आता कमालीचा बदल झाला आहे. राजश्रीचे सध्या काही ग्लॅमरस फोटो व्हायरल झाले असून, यात तिला ओळखणे निव्वळ कठीण झाले आहे. चित्रपटातील गावरान गंगा आता खऱ्या आयुष्यात ग्लॅमरस झाल्याचं पाहायला मिळत आहेत. तिचे हे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत असून, त्यावर अनेक लाईक्स मिळत आहेत.

rajshree landge
Photo Courtesy: Facebook/rajshree landge

राजश्रीला तिच्या खऱ्या आयुष्यात असेच ग्लॅमरस आणि बिनधास्त राहायला आवडते. तिने ‘गाढवाचे लग्न’, ‘सत्ताधीश’, ‘सिटीझन’, ‘ती फुलराणी’, ‘रातांधळा जावई’ आदी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र मागील काही काळापासून ती चित्रपटांपासून लांब आहे.

हेही वाचा :

World’s Most Admired Men 2021 | टॉप २०मध्ये ५ भारतीय, ‘किंग खान’ १४व्या क्रमांकावर; पंतप्रधान मोदींचा नंबर घसरला

बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी करत होता ऍड एजेन्सीमध्ये काम, जाणून घ्या जॉन अब्राहमचा पहिला पगार

Shriram Lagoo Death Anniversary | आठवण नटसम्राटाची, श्रीराम लागू यांच्या आयुष्यातील हे किस्से तुम्हाला नक्की ठाऊक नसतील


Latest Post

error: Content is protected !!