Monday, July 8, 2024

एमबीए करून राखी बनली डॉक्टर; म्हणतेय, ‘या’ अभिनेत्याचं करायचंय ऑपरेशन

बॉलिवूडमधील प्रसिद्धी पिपासू अभिनेत्रींपैकी एक असलेली राखी सावंत नेहमीच जोरदार चर्चेत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असतात. सध्या ती दुबईमध्ये आहे. तिथे ती एका कार्यक्रमात बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानी याच्यासोबत पोहोचली होती. तेथील तिचा एक व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये तिने लाल रंगाची ग्रॅज्युएशन कॅप आणि गाऊन घातले आहे. राखीच्या या व्हिडिओत अभिनेता अर्जुन बाजवा हादेखील दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत राखी सावंत (Rakhi Sawant) म्हणते की, “मी एमबीए पूर्ण केले आहे. डॉक्टर राखी सावंत.” या व्हिडिओत अभिनेता अर्जुन बाजवा (Arjun Bajwa) हादेखील तिला शुभेच्छा देत आहे आणि म्हणत आहे की, “आता राखी डॉक्टर बनली आहे आणि मी तिचा पेशंट आहे.” यादरम्यानच राखी पॅपराजींना म्हणते की, “मी याचे असे ऑपरेशन करेल की, मुन्नाभाईदेखील फेल होईल.”

या व्हिडिओत दिसते की, राखीला तिची डिग्री मिळाल्यानंतर पॅपराजी तिला शुभेच्छा देत आहेत. तसेच, ते म्हणत आहेत की, “राखी तर कधी घरचा अभ्यासही करत नव्हती, पण तरीही डॉक्टर बनली आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

एमबीएक करून राखी बनली डॉक्टर
राखीचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. नेटकरी तिच्या या व्हिडिओवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. तसेच, प्रश्न विचारत आहेत की, “कोणी एमबीए करून डॉक्टर कसे काय बनू शकते?” मात्र, चाहत्यांच्या या प्रश्नावर राखीने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये.

दुबईतील व्यावसायिकाला डेट करतेय राखी सावंत
राखीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर ती सध्या दुबईतील व्यावसायिक आदिल खान दुर्रानी (Adil Khan Durrani) याला डेट करत आहे. ते दोघेही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी नेहमीच एकत्र स्पॉट होतात. नुकतेच आदिल आणि राखीच्या ब्रेकअपच्या अफवा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. मात्र, तिने त्या खोट्या असल्याचे सांगितले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
स्वत:च्याच लग्नात ‘या’ अभिनेत्रीला ओढणी अन् नेकलेसचंही नव्हतं भान, फुल पिऊन लावलेले ठुमके
एक्स पत्नीविरुद्ध खटला जिंकल्यानंतर पुन्हा चर्चेत आला जॉनी डेप, पेंटिंग्स विक्रीतून कमावले ‘एवढे’ कोटी
सचिनच्या लेकीचा शॉपिंगचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरीही म्हणाले, ‘पैशांची कमाल बाबू भैय्या’

हे देखील वाचा