Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

राखी सावंतने केली नाकाची शस्त्रक्रिया; व्हिडिओ शेअर करत सांगितले शस्त्रक्रियेचे कारण

टेलिव्हिजनचा सर्वात वादग्रस्त रियॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ या शोला ओळखले जाते. ‘बिग बॉस १४’ चा भाग असलेल्या राखी सावंतने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. मात्र, या काळात तिच्या नाकालाही गंभीर दुखापतही झाली होती. एका टास्क दरम्यान राखीला ही दुखापत झाली. ज्यात जॅस्मिन भसीनने तिच्या चेहऱ्यावर एक जड मुकुट ठेवले होते. त्याचबरोबर दुखापतीनंतर अनेक महिन्यांनी राखीने आता तिच्या नाकाची शस्त्रक्रिया केली आहे.

राखीने नुकताच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. बिग बॉसच्या घरात तिला कसे आणि केव्हा दुखापत झाली हे सांगितले. तसेच, शस्त्रक्रियेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. तिने लिहिले आहे की, “धन्यवाद, डॉ जितेश शेट्टी. मी बिग बॉस १४ मध्ये जखमी झाले होते. मला खूप वेदना झाल्या पण एक किंवा दोन लोकांशिवाय कोणीही मला साथ दिली नाही.” (Actress Rakhi Sawant underwent nose surgery, video posted)

शस्त्रक्रियेनंतर मिळाला आराम
हा व्हिडिओ पोस्ट करताना राखीने असेही लिहिले की, “बिग बॉसच्या समाप्तीनंतर डॉ जितेश शेट्टीने ऑपरेशन केले आणि आता मी खूप आनंदी आहे. मी वेदनेपासून मुक्त आहे. तुमच्या सर्वांच्या प्रार्थनेबद्दल धन्यवाद.’ यासोबतच राखीने तिच्या नाकाला इजा केल्याचा शोचा एक व्हिडिओही शेअर केला आहे.

राखीने टास्कचा व्हिडिओ केला शेअर
राखीच्या शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ‘बिग बॉस १४’चे सर्व स्पर्धक एक टास्क करताना दिसत आहेत. याच दरम्यान, जॅस्मिनने राखीच्या डोक्यावर कागदापासून बनवलेला बदकाचा मुकुट घातला. यानंतर, कुटुंबातील सर्व सदस्यांनी जॅस्मिनला पाठिंबा दिला आणि सांगितले की, “राखी लक्ष वेधण्यासाठी दुखापतीचे नाटक करत आहे.”

त्याचवेळी, बिग बॉस १४ मध्ये जबरदस्त मनोरंजन केल्यानंतर राखी ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये पाहायला मिळाली. शो सुरू झाल्यानंतर अभिनेत्रीने घराबाहेर प्रदर्शन केले, त्यानंतर तिला पुन्हा शोमध्ये बोलावण्यात आले. राखी शोमध्ये ज्युली म्हणून गेली होती. त्याच दरम्यान ती खूप चर्चेत आली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सोनम कपूरने धोती आणि कुर्ता अशी केली पुरुषी वेशभूषा, वडील अनिल कपूर यांनी दिली प्रतिक्रिया

-‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

हे देखील वाचा