Friday, March 29, 2024

‘बिग बॉस ओटीटी’वर निया शर्माचा जलवा; ‘वाईल्ड कार्ड’ म्हणून करणार एन्ट्री

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री निया शर्मा ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये प्रवेश करणार आहे. ‘संडे का वार’मध्ये करण जोहरने बिग बॉस ओटीटीच्या घरात लवकरच वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची घोषणा केली होती. नंतत्यार कोणता कलाकार वाईल्ड कार्ड म्हणून शोमध्ये प्रवेश करेल, हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुकता होती.

बिग बॉसच्या चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. कारण टीव्हीच्या ‘कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन’ नियाने तिच्या सोशल मीडियावरून जाहीर केले आहे की, ती बिग बॉसच्या ओटीटी घरात प्रवेश करण्यास सज्ज आहे.

तिच्या इंस्टाग्रामवर स्वत: चा विलगीकरणाचा फोटो शेअर करत नियाने लिहिले की, “चला काहीतरी तूफानी करूया. १ सप्टेंबर रोजी बिग बॉस ओटीटी.” नियाच्या या पोस्टवर कलाकार मित्रांसोबत तिच्या चाहत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत.

खरं तर मागील काही वर्षांपासून नियाला बिग बॉसमधून ऑफर होत होता, पण तिने प्रत्येकवेळी शोमध्ये येण्यास नकार दिला होता. शेवटी निया या ओटीटी सिझनमध्ये सामील होण्यास तयार झाली आहे.

नियाला वादांपासून दूर राहायचे होते
वास्तविक आतापर्यंत नियाला बिग बॉसमधील तिच्या वृत्तीबद्दल काही शंका होत्या. आधीच वादात अडकलेल्या नियाला या रियॅलिटी शोच्या माध्यमातून अधिक वादात अडकण्याची इच्छा नव्हती. यावेळी निर्मात्यांनी तिचे मन वळवण्यात यश मिळवले. बिनधास्त वृत्ती आणि उत्साही स्वभावासाठी ओळखली जाणारी निया नक्कीच एक स्पर्धक म्हणून सिद्ध होईल, जी लोकांचे लक्ष वेधून घेण्यास सक्षम असेल. तिचे चाहतेही नियाच्या प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

६ आठवड्यांचा रियॅलिटी शो
सहा आठवड्यांचा हा रियॅलिटी शो बिग बॉस ओटीटी आता चौथ्या आठवड्यात पोहोचला आहे. या मोसमाची थीम ‘कनेक्टेड राहा’ आहे. इथे लोकांना आपापसात कनेक्शन बनवून पुढे जायचे आहे. सध्या बिग बॉसच्या या गेममध्ये शमिता शेट्टी, राकेश बापट, मिलिंद गाबा, अक्षरा सिंग, नेहा भसीन, प्रतीक सहजपाल, निशांत भट, मुस्कान जट्टाना आणि दिव्या अग्रवाल यांचे कनेक्शन कायम आहे. बिग बॉस ओटीटीमध्ये आपली चमक दाखवणाऱ्या काही स्पर्धकांना टीव्हीच्या बिग बॉस १५ मध्ये सामील होण्याची संधी दिली जाईल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ

हे देखील वाचा