Saturday, June 29, 2024

राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा! 2020मध्ये झालेल्या गर्भपाताविषयी म्हणाली, ‘5 महिन्यांच्या प्रेग्नंसी…’

आपल्या शानदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राणी मुखर्जी हिच्या नावाचाही समावेश होतो. राणीने तिच्या कारकीर्दीत पडद्यावर एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आहेत. या भूमिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेमही मिळाले आहे. यशाचे शिखर गाठणाऱ्या राणीने अलीकडेच स्वत:शी संबंधित एक खुलासा केला होता, ज्याने चाहत्यांनाही धक्का बसेल. राणीने सांगितले की, ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे‘ सिनेमाच्या शूटिंगपूर्वी प्रेग्नंसीच्या पाचव्या महिन्यात अभिनेत्रीने आपले बाळ गमावले होते.

राणी मुखर्जी (Rani Mukerji) हिने मेलबर्न फिल्म फेस्टिव्हल येथे गर्भपाताविषयी भाष्य केले. ती म्हणाली की, तिने याबाबत ‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान भाष्य केले नव्हते. कारण, तिला वाटले की, लोकांना हे सर्व प्रमोशनचे तंत्र म्हणतील. रिपोर्ट्सनुसार, राणी म्हणाली की, कदाचित ही पहिलीच वेळ होती, जेव्हा ती याबाबत खुलासा करत आहे. कारण, आजच्या जगात तुमच्या आयुष्याचा प्रत्येक भाग चर्चेत असतो. तसेच, सिनेमाबाबत बोलून सर्वांचे लक्ष वेधणे अजेंडा बनला जातो.

राणी मुखर्जीचा दुसऱ्या प्रेग्नंसीविषयी खुलासा
यादरम्यान राणी मुखर्जी म्हणाली की, “मी याबाबत बोलले नाही, कारण मला असे वाटले की, मी माझा वैयक्तिक अनुभव शेअर करत आहे. यामुळे सिनेमावर प्रभाव पडेल. ही त्या सालची गोष्ट आहे, जेव्हा कोव्हिड 19चा काळ होता. 2020मध्ये मी माझ्या दुसऱ्या बाळासोबत प्रेग्नंट होती. मात्र, 2020च्या अखेरच्या पाच महिन्यांच्या प्रेग्नंसीमध्ये मी माझे बाळ गमावले.”

पुढे बोलताना अभिनेत्री म्हणाली की, “‘मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे’ सिनेमाचे निर्माते निखिल आडवाणी माझ्याकडे गर्भपाताच्या 10 दिवसांनंतर ऑफर घेऊन आले होते. त्यांनी मला स्टोरी सांगितली. तेव्हाच मी याच्यासोबत जोडले गेले होते. मी बाळाला गमावले होते आणि ती भावना मला माहिती होती म्हणून असे घडले नव्हते, तर अनेकदा कोणताही सिनेमा योग्य वेळी येतो, जेव्हा तुम्ही त्यातून वैयक्तिकरीत्या जात असता. जेव्हा मी कहाणी ऐकली, तेव्हा मला विश्वास बसला नाही. मी विचार केला नव्हता की, नॉर्वेसारख्या देशात एक भारतीय कुटुंबाला असे काही पाहावे लागेल.”

राणीने पुढे बोलताना म्हटले की, “निर्माते आणि दिग्दर्शिका आशिमा छिब्बर यांना या गर्भपाताबद्दल काहीच माहिती नव्हते. जेव्हा ते ही मुलाखत पाहतील, तेव्हा त्यांना धक्का बसेल.”

राणीचा मिसेस चटर्जी वर्सेस नॉर्वे हा सिनेाम 17 मार्च 2023 रोजी रिलीज झाला होता. या सिनेमात राणीव्यतिरिक्त जिम सरभ, नीना गुप्ता आणि सौम्य मुखर्जी यांच्या भूमिका होत्या. (actress rani mukerji had miscarriage in 2020 actress says lost my baby into 5 months pregnancy)

महत्त्वाच्या बातम्या-
दिशा पटानीनंतर टायगर पुन्हा दिशा नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये? म्हणाला, ‘मी मागील 2 वर्षांपासून…’
‘बाईपण भारी देवा’ सिनेमाविषयी राज ठाकरेंचं मोठं भाष्य; म्हणाले, ‘माता, भगिनी कशाकशातून जातात…’

हे देखील वाचा