Monday, October 2, 2023

दिशा पटानीनंतर टायगर पुन्हा दिशा नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये? म्हणाला, ‘मी मागील 2 वर्षांपासून…’

‘हिरोपंती’ सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणारा अभिनेता टायगर श्रॉफ नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत असतो. कधी तो आगामी सिनेमामुळे, तर कधी रिलेशनशिपमुळे चर्चेचा धनी ठरतो. यावेळीही टायगर चर्चेत असण्यामागे त्याचे रिलेशनशिप आहे. एकेकाळी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी यांना बॉलिवूडमधील रोमँटिक आणि फिट कपल म्हणून ओळखले जात होते. मात्र, त्यांच्या ब्रेकअपमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. असे असले, तरीही त्यांनी सर्वांसमोर हे नाते स्वीकारले नव्हते. आता ब्रेकअपच्या एक वर्षानंतर टायगरचे नाव पुन्हा दिशा नावाशी जोडले जाऊ लागले आहे. मात्र, ही अभिनेत्री दिशा पटानी नसून दिशा धानुका आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, टायगर श्रॉफ (Tiger Shroff) आता दिशा धानुका (Disha Dhanuka) हिला डेट करत आहे. यावर आता टायगरने आपले मौन तोडले आहे आणि दिशासोबत डेटिंगबाबतही खुलासा केला आहे.

टायगरच्या फिटनेसची काळजी घेते दिशा
एका रिपोर्टनुसार, सध्या टायगर श्रॉफ आणि दिशा धानुका (Tiger Shroff And Disha Dhanuka) एकमेकांना डेट करत आहेत. एका मनोरंजन पोर्टलने दावा केला आहे की, दिशा एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये चांगल्या पदावर काम करत आहे. तसेच, अनेकदा ती टायगरला योग्य स्क्रिप्ट शोधण्यास मदत करते. कथितरीत्या दिशा पटानी (Disha Patani) हिच्यापासून वेगळे झाल्यानंतर टायगरने दिशाला डेट करणे सुरू केले होते. या पोर्टलने हाती आलेल्या माहितीच्या आधारे दावा केला की, “ते जवळपास दीड वर्षांपासून एकमेकांना भेटत आहेत. दिशा नेहमी त्याला स्क्रिप्टबाबत सल्ले देते. तसेच, त्याच्या फिटनेसचीही काळजी घेते. टायगरचे कुटुंबीयदेखील दिशाला पसंत करतात. प्रत्येकाला त्यांच्या नात्याविषयी माहिती आहे.”

काय म्हणाला टायगर?
टायगर श्रॉफ याला जेव्हा याविषयी प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा अभिनेता म्हणाला की, तो सिंगल आहे. माध्यमांशी बोलताना टायगर म्हणाला, “मागील काही महिन्यांपूर्वी मी विचार केला होता की, माझे कुणाशी नाते जोडले गेले आहे, पण नाही. मी मागील 2 वर्षांपासून एकटा आहे.”

अशातच दिशा पटानी हिचे जिम पार्टनरसोबत डेटिंगच्या बातम्यांनी जोर धरला आहे. नुकतेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यात दिशा तिचा मैत्रिणीला अलेक्झांडरशी बॉयफ्रेंड म्हणत ओळख करून देताना दिसत होती.

टायगर आणि दिशाच्या कामाविषयी
टायगरच्या कामाविषयी बोलायचं झालं, तर तो अखेरचा ‘बागी 2’ सिनेमात दिसला होता. तो आगामी ‘गणपत’, ‘बडे मियां छोटे मियां’ आणि ‘सिंगम अगेन’ यांसारख्या सिनेमात दिसणार आहे. दुसरीकडे, दिशा पटानी अखेरची ‘एक व्हिलन रिटर्न्स’ सिनेमात दिसली होती. त्यानंतर ती आता ‘योद्धा’, ‘कल्की’ आणि ‘कांगुवा’ यांसारख्या आगामी सिनेमात दिसणार आहे. (actor tiger shroff dating deesha dhanuka after breakup with disha patani actor reveals his relationship status read)

महत्त्वाच्या बातम्या-
‘बाईपण भारी देवा’ सिनेमाविषयी राज ठाकरेंचं मोठं भाष्य; म्हणाले, ‘माता, भगिनी कशाकशातून जातात…’
ऋतिकसोबत गर्लफ्रेंड सबाने शेअर केला रोमँटिक फोटो, एक्स पत्नीच्या कमेंटने लुटली सगळी मैफील; म्हणाली…

हे देखील वाचा