Thursday, June 13, 2024

‘बाईपण भारी देवा’ सिनेमाविषयी राज ठाकरेंचं मोठं भाष्य; म्हणाले, ‘माता, भगिनी कशाकशातून जातात…’

सध्या मराठी सिनेसृष्टीत एका सिनेमाचा चांगलाच बोलबाला असल्याचे पाहायला मिळत आहे. तो सिनेमा दुसरा तिसरा कोणता नसून ‘बाईपण भारी देवा‘ आहे. 30 जून रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. या सिनेमाने प्रत्येकाचे लक्ष वेधले आहे. चोहोबाजूंनी सिनेमाचे कौतुक होत आहे. असे असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हा सिनेमा पाहिल्यानंतर मोठी प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी मत व्यक्त करताना म्हटले की, फक्त महिलांनीच नाही, तर प्रत्येक पुरुषांनीही हा सिनेमा पाहायला हवा.

काय म्हणाले राज ठाकरे?
दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा एक व्हिडिओ अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये राज ठाकरे ‘बाईपण भारी देवा’ (Raj Thackeray On Baipan Bhari Deva) या बहुचर्चित सिनेमाविषयी बोलताना राज ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण विधान केले.

ते म्हणाले की, “त्या दिवशी मी पाहिल्यानंतर घरी आल्यावर पत्नीशी बोललो की, हा फक्त बायकांनी पाहायचा सिनेमा नाहीये, हा पुरुषांनी पाहायचा सिनेमा आहे. त्या माता, भगिनी कशाकशातून जात असतात, ही गोष्ट समजून घेणं, हे पुरुषांनी समजण्याची गरज आहे. महिलांनी जाऊन स्वत:ला रिलेट करणं, ते आलंच. पण नुसतं रिलेट करून नाही, तर ती गोष्ट समजा काही चुकीच्या गोष्टी असतील तर त्या पुरुषांनी दुरुस्त करणं आणि बाजूला काढणं, हे पुरुषांनी जाऊन पाहणं जास्त गरजेचं आहे. मला वाटतं की, बाईपणचं सर्वात जास्त यश हे त्याच्यात आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

सिनेमाने ओलांडला 70 कोटींचा टप्पा
कलाकार, त्यांचा दर्जेदार अभिनय, ओठांवर रुळणारी गाणी, कथानक या गोष्टींमुळे ‘बाईपण भारी देवा’ सिनेमा यशाच्या पायऱ्या चढत आहे. या सिनेमाने भारतात बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 70 कोटींहून अधिक रुपयांची कमाई केली आहे. तसेच, जगभरात हा सिनेमा 80 कोटींच्या घरात गेला आहे. तसेच, आता पुढील काही काळात हा सिनेमा 100 कोटींचाही टप्पा पार करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

सिनेमा 100 रुपयात पाहता येणार, केदार शिंदेंची घोषणा
सिनेमाचे दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) यांनी 11 ऑग्टपासून सिनेमा 100 रुपयात पाहता येणार असल्याची घोषणा केली. त्यांनी पोस्ट शेअर करत लिहिले की, “हा सिनेमा ‘तीने’ डोक्यावर घेतला. पण खरंतर मी तो पुरूषांसाठी सादर केला होता. कारण जोवर तो तीचं मन समजून घेत नाही तोवर काहीच वेगळं घडणार नाही!! आता मात्र तीचा मान सन्मान राखा. या शुक्रवार पासून ही बंपर ॲाफर समस्त पुरूष वर्गाला!! चांगला सिनेमा तुमची थिएटर मध्ये वाट पाहतोय….”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

सिनेमाचे कलाकार
केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या सिनेमात मराठी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्रींच्या मुख्य भूमिका आहेत. त्यामध्ये वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, रोहिणी हट्टंगडी, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर आणि दीपा परब यांचा समावेश आहे. (raj thackeray on baipan bhaari deva see video)

महत्त्वाच्या बातम्या-
ऋतिकसोबत गर्लफ्रेंड सबाने शेअर केला रोमँटिक फोटो, एक्स पत्नीच्या कमेंटने लुटली सगळी मैफील; म्हणाली…
‘गप्प बस! ती 2 लेकरांची आई…’, चाहत्याने नयनताराविषयी ‘तो’ प्रश्न विचारताच भडकला शाहरुख

हे देखील वाचा