कलर्स चॅनेलवरील ‘उतरन’ या मालिकेतून अभिनेत्री रश्मी देसाई घराघरात पोहोचली. यानंतर तिने प्रसिद्ध रियॅलिटी शो ‘बिग बॉस १३’ मध्ये अफलातून कामगिरी करत चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. असे म्हणतात ना की, ‘काळानुसार गोष्टी बदलतात.’ हे रश्मी देसाईच्या बाबतीत अगदी चपखलपणे बसते. ती पूर्वीपेक्षाही एकदम ग्लॅमरस झाली आहे. तिच्या कारकीर्दीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत तिच्यामध्ये झालेले बदल आपण फोटोंमधून पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया…
रश्मी देसाईचे ट्रॉन्सफॉर्मेशन सर्वांनाच प्रेरित करते. सध्या तिचा लेटेस्ट लूक सोशल मीडियावर धमाल करत आहे.
इतर अभिनेत्रींप्रमाणे रश्मीही इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. त्यामुळे ती आपले भन्नाट फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.
या फोटोंमधून तिचा जुना आणि नवीन लूक दिसत आहे. जुन्या लूकमध्ये तिला ओळखणेही कठीण झाले आहे.
रश्मीमध्ये तिच्या फॅशनपासून ते फिगरपर्यंत खूप बदल झाले आहेत. तिचे फोटो पाहून समजते की, ती स्वत: वर खूप मेहनत घेत आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, रश्मीने हा लूक मेहनत आणि सर्जरी करून बनवला आहे.
‘बिग बॉस’मधून बाहेर पडल्यापासून रश्मी सोशल मीडियावर भलतीच सक्रिय झाली आहे.
https://www.instagram.com/p/2XecpYivHP/?utm_source=ig_web_copy_link
आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सवर ती आपल्या आयुष्यातील गोष्टी शेअर करत चाहत्यांशी संवाद साधत असते.
रश्मीने टीव्ही इंडस्ट्रीसोबतच भोजपुरी सिनेमातही काम केले आहे.
रश्मी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी भोजपुरी, मणिपुरी, आसामी आणि बंगाली सिनेमांचाही भाग राहिली आहे.
रश्मीला टीव्ही इंडस्ट्रीमध्ये आता जवळपास १५ वर्षे होऊन गेली आहेत. तिने झी टीव्हीवरील ‘रावण’ या मालिकेतून अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. यानंतर ती ‘वो मीत मिला दे रब्बा’ या मालिकेतही दिसली होती.
अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर रश्मीला खरी ओळख ‘उतरन’ या मालिकेने मिळवून दिली होती.
रश्मी ‘परी हूं मैं’, ‘श्श्शश… फिर कोई है’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘जरा नचके दिखा’, ‘क्राईम पेट्रोल’, ‘खतरों के खिलाडी’, ‘अधूरी कहाणी हमारी’, ‘इश्क का रंग सफेद’, ‘नच बलिए’ आणि ‘झलक दिखला जा’ यांसारख्या कार्यक्रमांमध्ये दिसली आहे.
कारकीर्दीसोबतच रश्मी आपल्या लव्हलाईफमुळेही चर्चेत राहते.
रश्मीने सन २०१२ मध्ये आपल्या ‘उतरन’ मालिकेतील सहकलाकार ‘नंदीश संधू’सोबत लग्न केले होते.
परंतु लग्नाच्या एकाच वर्षानंतर दोघांमध्ये तणाव वाढले आणि चार वर्षांनंतर दोघांनीही घटस्फोट घेतला होता.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘चुरा के दिल मेरा गोरिया चली’, शिल्पा शेट्टीचा मालदीवमध्ये दिसला बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाज
-‘दंगल’ चित्रपटातील ‘बबिता’ने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी आजमावले होते डान्समध्ये आपले नशीब, आता आहे आघाडीची अभिनेत्री
-अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ