अबब! उर्वशी रौतेलाचा ५० लाखांचा बोल्ड अँड ब्युटीफुल लुक, पाहा या लूकचे दोन खास व्हिडीओ


बी टाऊनच्या सर्वात बोल्ड अभिनेत्रींपैकी एक असणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत राहते. कधी तिच्या व्हिडिओमुळे, कधी तिच्या फोटोमुळे, तर कधी तिच्या महागड्या वेषभूषेमुळे. उर्वशीने तिच्या सौंदर्याने आणि अदांनी लाखो, करोडो लोकांना घायाळ केले आहे. आता पुन्हा एकदा उर्वशी सर्व फॅन्सला वेड लावायला आली आहे.

उर्वशीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगला व्हायरल होत आहे. या व्हिडिओ आकाशी रंगाच्या स्लिप ड्रेसमध्ये उर्वशी खूपच बोल्ड आणि ब्युटीफुल दिसत आहे. उर्वशी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय मादक पोज देताना दिसत असून, तिचा हा अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच आकर्षित करत आहे. या व्हिडिओतील उर्वशीचे मादक डोळे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

उर्वशीने या व्हिडिओत घातलेल्या ड्रेसची किंमत जवळपास पाच लाख रुपये इतकी असून, तिने या घातलेल्या ज्वेलरीची किंमत ४५ लाख रुपये आहे. उर्वशीचा हा पूर्ण लुक ५० लाख रुपयांचा आहे. ग्लॅमरस वॉक तिचे एक्सप्रेशन चांगलेच भाव खाऊन जात असून, तिची फिगर, हॉट अंदाज कमाल दिसत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करताना उर्वशीने लिहिले, ” हार्ट कंट्रोलर हा उर्वशी नावाचा अर्थ आहे, मला हे नुकतेच समजले आहे.” तिचा हा व्हिडिओ लाखो लोकांनी पहिला असून, अनेकांनी त्यावर कमेंट्स देखील केल्या आहेत. उर्वशीचा नुकताच आशियाच्या टॉप १० मादक सुपरमॉडेलमध्ये समावेश झाला आहे.

तिच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती मोहन भारद्वाज यांच्या ‘ब्लॅक रोझ’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. शिवाय तिचे आता ‘वो चांद कहां से लाओगी.’ हे पंजाबी गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्याला फॅन्सने भेपुर प्रतिसाद दिला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.