Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

नॅशनल क्रश रश्मिका मंदानाच्या बोल्ड फोटोंनी लावली सोशल मीडियावर आग, सौंदर्य पाहून चाहते घायाळ

दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) तिच्या ‘पुष्पा’ चित्रपटाच्या दमदार यशाने सर्वत्र चर्चेत आहे. या चित्रपटातील रश्मिकाच्या दमदार आणि कसदार अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. चित्रपटात रश्मिकाच्या या दमदार अभिनयाने तिच्या चाहत्यांमध्येही चांगलीच वाढ झालेली दिसत असून, रश्मिका मंदाना तिच्या चित्रपटांइतकीच सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमीच चर्चेत असते. सध्या रश्मिकाच्या व्हायरल फोटोंची जोरदार चर्चा सुरू आहे.

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवताना दिसत असते. रश्मिकाने तिच्या कसदार अभिनयाने सिनेसृष्टीत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. तिच्या या फोटोवर तिचे चाहते नेहमीच फिदा होत असतात. सध्या रश्मिकाचे असेच हॉट फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत ज्यावर चाहत्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

हे व्हायरल फोटो रश्मिकाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. ज्यामध्ये रश्मिकाचा बोल्ड आणि सिझलिंग अंदाज पाहायला मिळत आहे. रश्मिकाच्या या हॉट फोटोंनी तिच्या चाहत्यांचा काळजाचा मात्र ठोका चुकवला आहे. या फोटोवर ते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हे फोटोशूट रश्मिकाने एका प्रसिद्ध मॅगझिनसाठी केले आहे ज्यामधले काही फोटो तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. याआधी रश्मिका मंदानाचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओही जोरदार व्हायरल झाला होता. दरम्यान अभिनेत्री रश्मिका मंदाना लवकरच ‘मिशन मजनू’ चित्रपटातुन हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. हा चित्रपट १० जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाची तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा