मायाळू जग्गूदादा..! घरगड्याच्या कुटुंबाचं सांत्वन करायला मावळातील छोट्याशा खेडेगावात गेला अभिनेता

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ (Jackie Shroff) जेवढा त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत, तेवढेच ते त्यांच्या औदार्यासाठीही ओळखले जातात. त्यांच्या घरात काम करणाऱ्या कामगारांनाही ते तितकाच जीव लावतात, जितका घरच्यांना! त्यांच्या या प्रेमाचं आणि दिलदार व्यक्तिमत्त्वाच उदाहरण अनेकदा आपल्याला पाहायला मिळालं आहे.

जॅकी श्रॉफ पोहचले पुण्यात
जॅकी श्रॉफ यांचं पुण्याच्या मावळमधील चांदखेड येथे फार्महाऊस आहे. नुकतेच जॅकी यांच्या फार्म हाऊसवर काम करणाऱ्या नोकरांच्या वडिलांचे निधन झाले. ही बातमी कानावर पडताच, जॅकी त्याच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी येथे आले. त्याचे हे फोटो पाहून चाहते त्यांचे भरभरून कौतुक करत आहेत. (jackie shroff went to farm worker house to console in maval pune)

नोकराच्या वडिलांचं निधन
सागर दिलीप गायकवाड हा जॅकी श्रॉफ यांच्या चांदखेड येथील फार्म हाऊवर काम करतो. त्याचे वडील दिलीप गायकवाड यांचं नुकतंच एका आजाराने दुःखद निधन झालं. याची माहिती कळताच अभिनेते गायकवाड कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी चांदखेड येथील त्यांच्या घरी पोहचले.

गायकवाड कुटूंबाला दिला धीर
जॅकी यांनी सागरच्या घरी येऊन शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन केले. याने त्या कुटुंबाला थोडा धीर मिळाला असावा. सांत्वन करताना त्यांनी संपूर्ण कुटुंबाला सुमारे तासभर वेळही दिला. यादरम्यान ते गायकवाड कुटुंबासोबत जमिनीवर बसलेले पाहायला मिळाले. आता जॅकी यांचा हा फोटो पाहून चाहते त्यांच्या साधेपणाचे कौतुक करत आहेत.

दिलदार आहेत जॅकी
जॅकी श्रॉफचे औदार्य पहिल्यांदाच दिसले नाही. अभिनेत्याचा मावळच्या या फार्महाऊसवर अनेकदा ते मुंबईहून येत असतात. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, जॅकी श्रॉफ इथे फिरायला येत असतात. पण इथे आल्यावर ते गावातील लोकांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post