साऊथचे कलाकार बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. अनेक कलाकारांनी बॉलिवूड पदार्पण केले आहे, तर काहीजण त्या मार्गावर आहेत. त्यापैकीच एक म्हणजे साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदाना होय. रश्मिका ‘गुडबाय’ या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण करणार आहे. प्रदर्शनापूर्वी रश्मिका या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. अशातच ती सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक हिच्यासोबत नवरात्री साजरी करण्यासाठी पोहोचली.
झाले असे की, ‘पुष्पा’ (Pushpa) फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रश्मिका ही गायिका फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) हिच्यासोबत स्टेजवर दिसत आहे. रश्मिकाने स्टोरीमध्ये फाल्गुनीसोबतचे फोटो शेअर करत लिहिले आहे की, “मुंबईत दांडिया आणि माझ्या चाहत्यांसोबत एक गोड सायंकाळ घालवली. नवरात्रीच्या शुभेच्छा.” या पोस्टसह अभिनेत्रीने फाल्गुनीलाही टॅग केले आहे. दुसरीकडे, फाल्गुनीनेही रश्मिकासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
दुसरीकडे या फोटोंमधील रश्मिकाच्या लूकबद्दल बोलायचं झालं, तर अभिनेत्री निळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तसेच, फाल्गुनी काळ्या आणि सोनेरी रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. दोन्ही कलाकार स्टेजवर दिसत आहेत. त्यांना पाहून चाहत्यांचा आनंदही द्विगुणित झाला आहे.
फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर वाद
फाल्गुनी पाठक आणि नेहा कक्कर (Neha Kakkar) यांची शाब्दिक चकमक अजूनही सुरू आहे. या सर्वांमुळे इंडस्ट्री दोन गटात विभागल्याचे दिसत असल्याची चर्चा रंगली आहे. नेहा आणि फाल्गुनी मागील काही दिवसांपासून भलत्याच चर्चेत आहेत. खरं तर, नेहाने फाल्गुनीचे गाणे रिमेक केले होते, जे तिला आवडले नाही. त्यावरून आता या दोघींमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे.
रश्मिकाचा ‘गुडबाय’ कधी होणार प्रदर्शित?
दुसरीकडे, अभिनेत्री रश्मिका मंदाना हिच्या आगामी ‘गुडबाय’ या सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तिचा हा सिनेमा येत्या 7 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) या मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! 6 वर्षे नांदली अभिनेत्री अन् आता ‘या’ कारणामुळे दिला पतीला घटस्फोट
दु:खद! आईच्या निधनाने पूर्ण तुटलाय महेश बाबू, बहीण मंजुलाची पोस्ट वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी










