Friday, April 26, 2024

आख्ख्या जगाच्या शुभेच्छा एकीकडं अन् आईच्या शुभेच्छा दुसरीकडं; रणबीरचे गोडवे गात म्हणाल्या, ‘शक्ती अस्त्र’

बॉलिवूडचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे रणबीर कपूर होय. रणबीर बुधवारी (दि. 28 सप्टेंबर) त्याचा 40वा वाढदिवस साजरा करत आहे. हे वर्ष रणबीरसाठी अनेक कारणांमुळे खास आहे. एक म्हणजे, त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘ब्रह्मास्त्र‘ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. दुसरीकडे, रणबीर लवकरच बापमाणूस बनणार आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण त्याला शुभेच्छा देत आहेत. मात्र, या सर्वांमध्ये त्याची आई आणि अभिनेत्री नीतू कपूर यांनी दिलेल्या शुभेच्छा सर्वात खास आहेत.

आई नीतू कपूरच्या खास शुभेच्छा!
अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी मुलगा रणबीर कपूर (Ranbir Kapoor) याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्या रणबीरसोबत दिसत आहेत. त्यांनी या फोटोसह कॅप्शनमध्ये रणबीरला शुभेच्छा देत लिहिले की, “आमच्यासाठी हे वर्ष मैलाचा दगड ठरले आहे. आज तुझ्या बाबांना मी खूप मिस करत आहे. ते आज खूप खुश असते आणि त्यांना अभिमानही वाटला असता. वाढदिवसाच्या शुभेच्छा राणा. तू माझा शक्ती अस्त्र आहेस.”

 

View this post on Instagram

 

A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54)

नीतू कपूर यांच्या या पोस्टवर रणबीरचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा रणबीर. ब्रह्मास्त्रच्या यशासाठी शुभेच्छा.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो रॉकस्टार.” आणखी एका युजरने लिहिले की, “हा आजचा सर्वात सुंदर फोटो आहे.” याव्यतिरिक्त रणबीरची बहीण रिद्धिमा कपूर साहनी हिने लव्ह इमोजी कमेंट केले आहेत. तसेच, इतर कलाकारही रणबीरला शुभेच्छा देत आहेत.

हेही वाचा- ‘कोड नेम तिरंगा’मध्ये दिसणार परिणीतीच्या एक्शनची धमाल, अंगावर काटा आणणारा ट्रेलर पाहाच

रणबीरच्या सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्याचे यावर्षी दो सिनेमे प्रदर्शित झाले आहे. सर्वप्रथम तो यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनलेला ‘शमशेरा’ या सिनेमात दिसला होता. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. मात्र, यानंतर तो अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ या सिनेमात झळकला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. अजूनही हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. रणबीरच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचं झालं, तर तो लवकरच संदीप रेड्डी वांगा यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या ‘ऍनिमल’ या सिनेमात झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
साऊथच्या अभिनेत्रींसोबत घडली धक्कादायक घटना! मॉलमध्ये प्रमोशनसाठी गेल्यावर गर्दीतच…
धक्कादायक! ‘भाभीजी घर पर है’ फेम अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, 19 वर्षीय मुलाचे निधन

हे देखील वाचा