Monday, October 2, 2023

उर्फी जावेदचा विनयभंग? धक्कादायक खुलासा करत म्हणाली, ‘मुले घाणेरडे बोलत होते आणि…’

अभिनेत्री उर्फी जावेदने आपल्या वेगवेगळ्या ड्रेसने सगळ्यांना आपल्याकडे आकर्षित करते. उर्फीला बिग बॉस ओटीटीमुळे खरी ओळख मिळाली. परंतु आता ती तिच्या वैयक्तिक कारणांमुळे सतत चर्चेत येते. उर्फी सोशल मीडियावर सतत सक्रिस असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिची पोस्ट पाहून चाहते तिचे कौतुक कमी आणि तिला ट्रोल खूप करत असतात. अनेकदा उर्फीचे व्हिडिओ पाहून नेटकरी तिची खिल्ली उडवत असतात. उर्फीने नुकताच एक किस्सा शेअर केला आहे. पण हा किस्सा ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.

उर्फी (uorfi javed ) मुंबईहून गोव्याला जात होती, त्याचवेळी फ्लाइटमध्ये काही मुलांनी तिच्याशी गैरवर्तन केलं. उर्फीने स्वतः या घटनेची माहिती तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली आहे. उर्फी जावेद 20 जुलै रोजी मुंबई विमानतळावर दिसली. ती सुट्टीसाठी गोव्याला जात होती. यादरम्यान ती पापाराझीच्या कॅमेऱ्यातही दिसली. यादरम्यान उर्फीने तिच्या केसांचा रंग गुलाबी केल्याचे दिसले. जेव्हा उर्फी फ्लाइटमध्ये पोहोचली तेव्हा मुलांच्या एका गटाने तिला ओळखले आणि तिच्यावर टिका करण्यास सुरुवात केली.

उर्फीने सांगितले की, “मी काल मुंबईहून गोव्याला जात असताना मला शोषणाला सामोरे जावे लागले. व्हिडिओमध्ये ही मुले घाणेरडे बोलत होते आणि विनयभंग करत होते. ते माझे नाव घेत होते. मी त्यांना अडवलं तेव्हा त्यांच्यापैकी एकाने सांगितले की, त्याचे मित्र नशेत आहेत. नशेत असताना हे स्त्रीशी गैरवर्तन करण्यासाठी कोणतेही कारण नाही. मी एक व्यक्ती आहे, सार्वजनिक मालमत्ता नाही.”

दरम्यान, उर्फी विषयी बोलायच झाले तर, ‘बिग बॉस ओटीटी‘च्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेऊन प्रसिद्धीच्या झाेतात आलेली उर्फी जावेद हिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका केल्या आहेत. उर्फी ‘मेरी दुर्गा‘, ‘चंद्र नंदनी‘ यांसारख्या दमदार मालिकेत दिसली.

अधिक वाचा- 
‘मर्द असाल तर मणिपूर…’ युजरचे ‘काश्मीर फाइल्स’च्या दिग्दर्शकाला आव्हान
“आम्ही सुपरस्टार झालो…” बाईपण भारी देवा सिनेमाला मिळणारा प्रतिसाद पाहून वंदना गुप्तेंनी व्यक्त केल्या भावना

हे देखील वाचा