Thursday, January 16, 2025
Home अन्य चार वर्षापासून रतन राजपूत का आहे इंडस्ट्रीपासून लांब? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

चार वर्षापासून रतन राजपूत का आहे इंडस्ट्रीपासून लांब? अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

टेलव्हिज क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री रतन राजपूत ही ‘अगले जनम मोहे बिटिया ही कीजो’ या मालिकामधून ती घराघरामध्ये पोहोचली होती. तिने या मालिकेमध्ये ‘ललिया’ नावाची भूमिका निभवली होती जी खूपच प्रसिद्ध झाली होती. या मालिकेची स्टोरी खूपच चांगली होती ही मालिका खूप गाजली होती. यानंतर रतनने ‘संतोषी मां’ या मालिकामध्ये काम केले होते मात्र, यानंतर ती अभिनय क्षेत्रापासून दिसेनासी झाली.

टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत (Ratan Rajput) तिने आपल्या दमदार अभिनयाने आपली वेगळीच ओळख निर्माण केली होती मात्र , ती सध्या अभनिय क्षेत्रापासून चार हात लांब झाली आहे. जरी ती टीव्ही जगापासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर नेहीमी सक्रिय असते. तिने कमी मालिकांमध्ये काम करुनही तिला चाहते आजही विसरले नाहीत.

अभिनेत्री रतन राजपूत हिने नुकत्याचत दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, तिच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या आयुष्यामध्ये ती खूप कठीण परिस्थितीमध्ये प्रवास करत होती. तेव्हा तिचा ‘संतोषी मां’ मालिकाचे शुटिंग संपले होते. अभिनेत्रीने सांगितले की, “2018 मध्ये ‘सेतोषी मां’ मालिका संपल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्या वडिलांना मी गमवले होते. हे माझ्यासाठी खूप माठा धक्का होता. त्या दिवसामध्ये मी डिप्रेशनमध्ये गेले होते, मला काहीच करायचे न्हवते.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ratan Raajputh (@ratanraajputh)

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, “तीन महिण्यापर्यत गावामध्ये राहून शेती करणे माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरले आहे. त्या दिवसांमध्ये मी खरे आयुष्य जगले या गावामध्ये मी शिकले की, इथे लोक जगण्यामध्ये दिखावा करत नाहीत. मी तिथे मनसोक्त जगले, स्वत:ला शोधलं. गावामध्ये राहून मला माझ्या आयुष्यामध्ये बघण्याचा नवीन दृष्टीकोण मिळाला. आता मी इंडस्ट्रीमध्ये परत यायला तयार आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ratan Raajputh (@ratanraajputh)

तिने आपला इलाजकरण्यासाठी तिने मानसशास्त्रज्ञांचा सल्ला घेतला. तिने इलाज पूर्ण करण्यासाठी इंडस्ट्रीला राम राम ठोकला आणि एका छोट्याश्या गावामध्ये शेती करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी तिच्या तब्येतीमध्ये सुधारदेखिल आला त्यामुळे तिने मुंबई सोडुून दिली होती आणि एका छोट्याशा गावामध्ये राहत होती आता मात्र रतन इंडस्ट्रीमध्ये पुन्हा येण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. ती लवकरच इंडस्ट्रीमध्ये झळकणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मुस्लिम देशात लाऊडस्पीकरवर अजानला बंदी मग आपल्याकडे का नाही?’, प्रसिद्ध भक्तीगीत गायिकेचा रोखठोक सवाल
एकेकाळी लता मंगेशकरांसाठी आव्हान होत्या अनुराधा पौडवाल, मात्र ‘या’ एका निर्णयाने बदलले करिअर

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा