Thursday, April 25, 2024

पतीवर लावला चाकूहल्ल्याचा आरोप, तर ‘या’ कारणामुळे रति अग्निहोत्री गेल्या होत्या चित्रपटांपासून लांब

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत अभिनेत्री रति अग्निहोत्री (Rati Agnihotri)  यांचा समावेश होतो. त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांनी बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील त्यांच्या अभिनयाची जादू दाखवली आहे. केवळ 10 वर्षाच्या असताना त्यांनी अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले होते. त्यांनी मॉडेलिंगपासून त्यांच्या करिअरला सुरुवात केली. अशातच रविवारी (10 डिसेंबर) रोजी त्या त्यांचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म 10 डिसेंबर 1960 रोजी उत्तरप्रदेशमधील बरेली येथे झाला. लहान असताना त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता की, त्यांना अभिनायात रस आहे. त्या 15 वर्षाच्या असताना त्यांचे संपूर्ण कुटुंब चेन्नई येथे स्थलांतर झाले.

16 वर्षाच्या असताना मिळाला पहिला ब्रेक
चेन्नईमध्ये शिक्षण पूर्ण करताना रति अग्निहोत्री यांनी तमिळ चित्रपटात काम करण्यास सुरवात केली. त्या अभिनेत्री बनण्याचे सगळे श्रेय तमिळ दिग्दर्शक भारतीराजा यांना जाते. त्यांनी रति या केवळ 16 वर्षाच्या असताना ‘पुदिया वरपुकल’ या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. 1979 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट झाला होता. यानंतर त्यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर आल्या. यानंतर पुढच्या तीन वर्षात त्यांनी तेलगू आणि कन्नडमध्ये 32 चित्रपटात काम केले. सुरुवातीला त्यांना तमिळ भाषा येत नव्हती, तेव्हा त्या तमिळ डायलॉग हिंदीमध्ये लिहून ते पाठ करत असायच्या. त्यानंतर ‘भाग्यराजा’ या चित्रपटातून त्यांनी तमिळ भाषा शिकली. त्यांनी रजनीकांत, चिरंजीवी, नागेश्वर राव, कमल हासन यांसारख्या कलाकारांसोबत काम केले आहे. (actress rati agnihotri celebrate her birthday : lets know about her life)

चित्रपटसृष्टीपासून झाल्या दूर
रति यांनी 1981 मध्ये ‘एक दुजे के लिये’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर 4 वर्षांनी म्हणजेच 1985 मध्ये व्यावसायिक अनिल वीरवानी यांच्याशी विवाह केला. 1987 मध्ये त्यांनी तनुज नावाच्या एका गोंडस मुलाला जन्म दिला. यानंतर त्या पूर्णपणे त्यांच्या संसारात रमल्या आणि संसार सांभाळू लागल्या. असे म्हटले जाते की, त्यांनी चित्रपटात काम करावे अशी त्यांच्या पतीची इच्छा नव्हती.

2001 साली चित्रपटसृष्टीत पुनरागमन
रति यांनी 2001 साली चित्रपटसृष्टीत पुन्हा एकदा प्रवेश केला. त्यांनी ‘कुछ खट्टी, कुछ मिठी’ या चित्रपटात काजोलच्या ग्लॅमरस आईचे पात्र निभावले होते. यानंतर त्यांनी ‘यादे’ आणि ‘देव’ या चित्रपटात काम केले. तसेच २० वर्षानंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत देखील प्रवेश केला. 2001 मध्ये ‘मजनू’ 2003मध्ये ‘अनयर’ आणि एका इंग्लिश चित्रपटात काम केले.

पती करत होता मारहाण
रति यांनी त्यांचा पती अनिल वीरवानी यांच्यावर 2015 साली चाकूने मारल्याचा आणि धमकी दिल्याचा आरोप केला होता. याआधी देखील त्यांनी त्यांच्या पती विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. 2015 मध्ये एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते की, मागील अनेक दिवसापासून त्या पतीचा त्रास सहन करत आहेत. त्या केवळ त्यांच्या मुलासाठी शांत राहिल्या होत्या, जेणेकरून या सगळ्याचा परिणाम त्यांच्या मुलावर होणार नाही. काही काळानंतर त्यांनी त्यांच्या पतीसोबत घटस्फोट घेतला.

हेही वाचा-
किंग खानसह खिलाडी आणि सिंघम अडचणीत; ‘या’ प्रकरणी हायकोर्टाची नोटीस
रितेश देशमुख करणार राजकारणात एंट्री? देवेंद्र फडणवीस यांचा मोलाचा सल्ला, म्हणाले…

हे देखील वाचा