‘अंदाज अपना अपना‘ हा चित्रपट 1994 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाशी संबंधित अनेक किस्से बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहेत. या चित्रपटाच्या सेटवर रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यात जोरदार भांडण झाले होते. ‘अंदाज अपना अपना’ मधील अनेक कलाकार त्याच्या किस्सेसाठी देखील प्रेक्षकांमध्ये खूप प्रसिद्ध आहे, परंतु आज आम्ही तुम्हाला या चित्रपटाशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत ज्याबद्दल तुम्हाला नक्कीच माहिती नसेल.
29 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘अंदाज अपना अपना’ (Andaz Apna Apna ) या चित्रपटात करिश्मा कपूर, रवीना टंडन, आमिर खान आणि सलमान खान मुख्य भूमिकेत दिसले होते. आयएमडीबीला दिलेल्या एका मुलाखतीत करिश्मा कपूरने या चित्रपटाच्या शूटिंगची आठवण काढताना तिच्या सहकलाकारांबद्दल आणि चित्रपटाशी संबंधित अनेक न ऐकलेल्या गोष्टींची माहिती दिली. या दरम्यान करिश्माने एका घटनेबद्दल सांगितले जे ऐकून तुम्हालाही हसू येईल.
‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये तुम्ही पाहिलेच असेल की, दोन्ही मुख्य अभिनेत्री एका खांबाला बांधलेल्या दिसतात आणि दोन्ही नायक त्यांना वाचवतात. आता तुम्ही विचार करत असाल की, यात नवीन काय आहे, असे अनेक चित्रपट आहेत, त्यामुळे तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की, या सीनमध्ये कदाचित काही खास नसेल, पण याच्या शूटिंगची कथा खूपच रंजक होती.
त्या काळात कलाकार अनेक शिफ्टमध्ये काम करायचे आणि कधी कधी चित्रपटाच्या शूटिंगसाठी रात्रंदिवस काम करायचे. राजुमार संतोषी यांच्या ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटासाठी आमिर, करिश्मा, रवीना आणि सलमाननेही असेच काहीसे केले होते. चित्रपटाची संपूर्ण टीम क्लायमॅक्स सीन शूट करत होती ज्यामध्ये दोन्ही अभिनेत्री एका खांबाला बांधल्या आहेत.
हा सीन शूट करत असताना सगळ्यांना भूक लागली आणि सगळे कलाकार आणि क्रू मेंबर्स शूटिंगमधून ब्रेक घेऊन जेवायला गेले. सर्वजण भुकेने इतके दंग होते की, या दोन अभिनेत्रींना खांबाला बांधल्याचेही कोणाच्याही लक्षात राहीले नाही. करिश्मा कपूरने तिच्या मुलाखतीत सांगितले होते की, दोघेही ‘हॅलो-हॅलो’ ओरडत राहिल्या, पण तोपर्यंत सर्वजण त्यांना सोडून गेले होते. (Actress Raveena-Karisma was tied to a tree on the sets of Andaz Apna Apna the actress told an interesting story)
आधिक वाचा-
–‘हम साथ साथ है’ चित्रपटाला माधुरी दीक्षितने दिलेला नाकार; अभिनेत्री सलमानचा उल्लेख करत म्हणाली…
–मुंबई ट्राफिक? वाहतूक कोंडीमुळे रिंकू राजगुरूचा संयम संपला; म्हणाली…