२१व्या वर्षीच घेतला सिंगल मदर होण्याचा निर्णय, ‘असा’ रोचक आहे रवीना टंडनचा सिनेसृष्टीतील प्रवास

0
174
Photo Courtesy: Instagram/officialraveenatandon

‘मस्त मस्त गर्ल’ या नावाने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री रवीना टंडनने तिच्या करिअरमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. अनेक गाण्यांवर डान्स केला आहे. इथूनच ती नावारूपाला आली आणि तिने बॉलिवूडमध्ये तिची अशी एक खास जागा आणि नाव तयार केले. एका पेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम करून ती अनेक अभिनेत्रींना मागे सारून पुढे आली होती. रवीना बुधवारी(26 ऑक्टोबर) तिचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर जाणून घेऊया तिचा प्रवास.

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

रवीनाचा जन्म 26ऑक्टोबर1974 साली मुंबई येथे झाला. तिचा जन्म चित्रपटाशी संबंधित घरात झाला, त्यामुळे लहानपणापासूनच अभिनयाचे बाळकडू तिला पाजले गेले‌ होते. तिचे वडील रवी टंडन हे एक प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते होते. त्यांनी ‘नजराना’, ‘एक मै एक और तू’, ‘खेल’, ‘खुद्द’ आणि ‘वक्त की दिवार’ यांसारख्या चित्रपटात काम केले. यासोबत आणखी एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल की, रवीना ही प्रसिद्ध कॅरेक्टर आर्टिस्ट मॅक मोहन यांची भाची आहे. मॅक मोहन हे तेच आहेत, ज्यांनी ‘शोले’ या चित्रपटात सांबा हे पात्र निभावले होते. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम लहानपणापासूनच रवीनावर झाला होता. केवळ वयाच्या 17 व्या वर्षी तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता. (Raveena tendon birthday special she became single mother at age of 21)

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

तिने बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने ‘मोहरा’, ‘दिलवाले’, ‘अंदाज अपना-अपना’ आणि ‘दुल्हे राजा’ यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले. 1995 साली तिचे करिअर काही प्रमाणात डबघाईला आले होते. परंतु ‘खतरों के खिलाडी’ने ती पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर एक सुपरहिट अभिनेत्री सिद्ध झाली. 1998 मध्ये प्रदर्शित झालेला ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटाने खूप कमाई केली होती. हा चित्रपट त्या वर्षाचा दुसरा सुपरहिट चित्रपट ठरला होता. नुकतेच हा चित्रपट प्रदर्शित होऊन 24 वर्ष पूर्ण झाले आहेत. या संबंधीत रवीनाने सोशल मीडियावर एक पोस्ट देखील केली होती.

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

यानंतर तिने1999आली ‘शूल’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात प्रेक्षकांनी पहिल्यांदा रवीनाला ग्लॅमरशिवाय पाहिले. या चित्रपटात तिचे पात्र अगदी साधे होते. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले होते. यानंतर 2001 मध्ये तिने ‘दमन’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटातून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले की, ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा नॅशनल अवॉर्ड मिळाला होता. नंतर 2003 मध्ये ‘सत्ता’ आणि 2004 मध्ये ‘दोबारा’ या चित्रपटात काम करून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मने जिंकून घेतली.

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

यानंतर काही काळासाठी ती चित्रपटापासून दूर राहिली होती. त्यावेळी तिने तिचा सगळा वेळ तिच्या कुटुंबाला दिला होता. परंतु ती जेव्हा परत आली तेव्हा तिने हे सिद्ध केले होते की, तिची अभिनयाची आवड अजूनही जिवंत आहे. तिने 2017 साली ‘मातृ’ या चित्रपटात अतिशय उत्तम पात्र निभावले होते.

View this post on Instagram

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon)

रवीना ही तिच्या नियमानुसार तिचे आयुष्य जगते. जेव्हा ती 21वर्षाची होती तेव्हा तिने सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला होता. तिने पूजा आणि छाया नावाच्या दोन मुली दत्तक घेतल्या. त्यावेळी त्यांचे वय 11आणि 8 असे होते. छायाचे आता लग्न झाले आहे. यानंतर 2004 मध्ये रवीनाने अनिल थडानीसोबत लग्न केले. त्या दोघांना राशा आणि रणबीरवर्धन ही दोन मुले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही नक्की वाचा-
अजय देवगणच्या ‘या’ आरोपांमुळे खचून गेली होती रवीना टंडन, केला होता आत्महत्येचा प्रयत्न
सुरुवातीला लोकांच्या उलट्या साफ करायची रवीना टंडन, करिअरबद्दल केला हैराण करणारा खुलासा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here