Friday, March 14, 2025
Home बॉलीवूड One Friday Night: रवीनाच्या नवीन सिनेमाचा टीझर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलचा भडीमार; तुम्हीही पाहाच

One Friday Night: रवीनाच्या नवीन सिनेमाचा टीझर रिलीज, सस्पेन्स आणि थ्रिलचा भडीमार; तुम्हीही पाहाच

नव्वदचे दशक गाजवणाऱ्या अनेक अभिनेत्री आजही सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. यामध्ये रवीना टंडन हिच्या नावाचाही समावेश आहे. रवीनाने तिच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले आहेत. अशात ती तिच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. रवीना तिच्या ‘वन फ्रायडे नाईट’ या सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांनी सिनेमाचा टीझर जाहीर केला आहे. हा टीझर सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला आहे.

रवीना टंडन (Raveena Tandon) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर शानदार अवतारात दिसणार आहे. खरं तर, तिने मागील वर्षीच ओटीटीवर पदार्पण केले आहे. अशात ती आता लवकरच ‘वन फ्रायडे नाईट’ (One Friday Night) सिनेमात दिसणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

‘वन फ्रायडे नाईट’ टीझर
सोमवारी (दि. 24 जुलै) रवीनाच्या आणखी एका नवीन सिनेमाची घोषणा झाली आहे. तो सिनेमा म्हणजेच ‘वन नाईट फ्रायडे’ होय. निर्मात्यांनी या सिनेमाचा टीझर रिलीज केला आहे. हा टीझर खूपच थ्रिलने भरलेला आहे. सिनेमातील कलाकारांबद्दल बोलायचं झालं, तर यामध्ये रवीना टंडन, मिलिंद सोमण आणि विधी चितालिया यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by JioCinema (@officialjiocinema)

या सिनेमाची दिग्दर्शन मनीष गुप्ता यांनी केले आहे. तसेच, या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे यांच्या खांद्यावर आहे. जिओ सिनेमाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून या सिनेमाचा टीझर शेअर करण्यात आला आहे. हा टीझर शेअर करत लिहिले आहे की, “‘वन फ्रायडे नाईट’वर जेव्हा रोमांचक क्षण भयानक स्वप्नात बदलतो, तेव्हा काय होते.”

कधी होणार रिलीज?
‘वन फ्रायडे नाईट’ हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. या सिनेमाचा प्रीमिअर 28 जुलै रोजी होणार आहे. या सिनेमाची कहाणी रमेश रवींद्रनाथ आणि कमल चोप्रा यांनी लिहिली आहे. (actress raveena tandon film one friday night teaser released)

महत्त्वाच्या बातम्या-
प्रसिद्ध अभिनेता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट, भावाने दिली हेल्थ अपडेट; चाहत्यांना म्हणाला, ‘प्रार्थना करा…’
‘इंडियाज गॉट टॅलेंट’ शोमधून धक्कादायक बातमी! स्पर्धकाच्या डोक्याला लागली आग, पाहून शिल्पा-किरणलाही शॉक

हे देखील वाचा