Thursday, April 18, 2024

रवीना टंडनच्या लेकीचा गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, ‘तुझा आवाज थेरपीसारखा…’

रवीना टंडनच्या मुलीने अजून इंडस्ट्रीत पाऊलही ठेवलेले नाही, पण ती सगळीकडे गाजली आहे. राशा ही सोशल मीडिया स्टार आहे. अशात आता ती लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. राशा अभिषेक कपूरच्या चित्रपटातून डेब्यू करणार आहे. या चित्रपटात अजय देवगणचा भाचा अमन देवगण तिच्यासोबत दिसणार आहे. आपला अभिनय दाखवण्यापूर्वी राशाने तिच्या गायनाची प्रतिभा चाहत्यांना दाखवली आहे, ज्यानंतर सगळेच तिचे चाहते झाले आहेत. राशाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गाणे गाताना दिसत आहे.

जागतिक संगीत दिनानिमित्त राशाने तिच्या स्टेज परफॉर्मन्सपैकी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती व्हॅलेरी हे गाणे अतिशय मधुर आवाजात गाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये राशा ब्लॅक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. यासाेबत तिने मॅचिंग बूटही कॅरी केला आहे.

अशात राशाच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, ‘तुझा आवाज खूप गोड आहे.’, तर दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले, ‘तुझा आवाज आणि चेहरा मला पाॅझिटिव्हीटी देतो.’ अशात एका चाहत्याने राशाला करण जोहरच्या चित्रपटाबद्दल विचारले. त्याने कमेंट करत लिहिले, ‘कजोचा चित्रपट कधी साइन करत आहात.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasha (@rashathadani)

माध्यमातील वृत्तानुसार, राशा वयाच्या 6व्या वर्षापासून संगीत शिकत आहे. उस्ताद कादिर मुस्तफा यांच्याकडून तिने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले आहे. यासोबतच तिने शंकर महादेवन यांच्या अकादमीतून एक कोर्सही केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rasha (@rashathadani)

राशाच्या आगामी चित्रपटाचे टायटल अद्याप निश्चित झालेले नाही. या चित्रपटात राशा आणि अमनसोबत डायना पेंटी देखील दिसणार आहे. (bollywood actress raveena tandon daughter rasha thadani singing video viral on social media fans says your voice works as therapy for me )

अधिक वाचा –
‘मोगॅम्बो खुश हुआ’, म्हणत पडद्यावर क्रूर खलनायक रंगवणारे अमरीश पुरी, सिनेमात येण्यापूर्वी राबले विमा कंपनीत
‘बबिता जी’ नेपाळमध्ये घेत आहे सुट्टयांचा आनंद, मुनमुन दत्ताने शेअर केले ट्रिपचे जबरदस्त फोटो

हे देखील वाचा