Tuesday, July 9, 2024

रश्मिका मंदानाच्या ‘सामी सामी’ गाण्यावर थिरकल्या ‘या’ मराठी तारका, व्हिडिओ होतोय व्हायरल

इंस्टाग्रामवरील रिल्स हा प्रकार सध्या भरपूर फेमस झाला आहे. लॉकडाऊनच्या काळानंतर इंस्टाग्रामवरील रिल्स प्रकार खूप फेमस झाला. लॉकडाऊनमुळे अनेक कलाकार रिल्स बनवायला लागले. रिल्स माध्यमातून अनेक नवनवीन कलाकार नवीन चेहरे लोकांचे मनोरंजन करू लागले. टीवी माध्यमे, सिनेमे बंद असताना हे एकच माध्यम करमणुकीचे होते, त्यामुळे इंस्टाग्रामवरील हा प्रकार अल्पावधीत काळातच प्रेक्षकांच्या पसंतीस पडला.

अनेक जुने नवीन अभिनेत्री अभिनेते रिल्स या माध्यमाकडे वळले. रील्स माध्यमातून प्रसिद्ध झालेले अनेक नवीन चेहरे आपणास टीव्ही, वेबसिरीज, फिल्म या माध्यमांमध्ये दिसून येत आहेत. यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळवून त्यांचे फॅन फॉलोवर्स वाढले. याचा फायदा टीव्ही मालिका आणि सिनेमे निर्माते घेऊन त्यांना संधी देत आहेत.

तसाच सध्या मराठीमध्ये एक ट्रेंडिंगला चाललेला व्हिडिओ हा रेश्मा शिंदे (reshma shinde) आणि नम्रता प्रधान यांचा आहे. ‘सामी सामी’ हे साऊथ गाणे घेऊन त्यावर ती त्यांनी रील्स केली आहे. त्यांची अदा आणि त्यांचा त्या गाण्यावर केलेला डान्स चाहत्यांना फार आवडत आहे. हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर ट्रेंडिंगला असलेला आपणास दिसून येतो. आपल्या भूमिकांमधील शूटिंगच्या वेळी आपापल्या व्यक्तिरेखेत असताना मधल्या फावल्या वेळेत हा व्हिडिओ केलेला आपणास समजून येतो. (actress reshma shinde share her reels on social media)

अनेक अभिनेत्री आणि अभिनेते शूटिंगच्या दरम्यानचा मधला फावला वेळ वाया न घालवता इंस्टाग्रामवर रिल्स करून मार्गी लावतात. या रिल्समुळे अभिनेत्री आणि अभिनेते यांचे फॅन फॉलोवर्स वाढतात. सध्या ट्रेंड चालू आहे की, ज्याचे जास्त फॅन फॉलोवर्स त्याची सध्या इंडस्ट्रीत जास्त आहे. त्यामुळे अनेक अभिनेत्री, अभिनेते रिल्स करताना आपल्याला दिसून येतात. रेश्मा शिंदे आणि नम्रता प्रधान यांचा असाच व्हिडिओ चाहत्यांना आवडताना दिसतो आहे आणि हा व्हिडिओ सध्या ट्रेंडिंग आहे.

रेश्मा शिंदे सध्या स्टार प्रवाहावरील ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिचे दीपा नावाचे पात्र चांगलेच गाजत आहे. मालिकेतील तिच्या पात्राला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा :

टोन्ड बॉडी फॉन्ड करत नेहा पेंडसेने शेअर केला तिचा मोनोकीनीमधील फोटो शेअर, पाहाच

काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ‘टाईमपास’मधील प्राजुचा तडका, ग्लॅमरस आला समोर

भावाच्या निधनावर महेश बाबूने लिहिली भावनिक पोस्ट, म्हणाला ‘तू नेहमीच माझी…’

 

हे देखील वाचा