Friday, December 8, 2023

रेश्मा शिंदेने देखील केला ‘हवा मैं उडती जाये,’ गाण्याचा ट्रेंड फॉलो, सोशल मीडियावर व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

आजच्या एकविसाव्या शतकात देखील आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात वर्णभेद केला जातो. अनेकवेळा अनेक ठिकाणी गोऱ्या रंगाच्या माणसांना आणि सावळ्या रंगाच्या माणसांना वेगळी वागणूक दिली जाते. या एका आगळ्या-वेगळ्या विषयावर भाष्य करणारी स्टार प्रवाहवर ‘रंग माझा वेगळा’ नावाची मालिका आहे. मागच्या वर्षी या मालिकेला सुरुवात झाली. एक वेगळी कहाणी घेऊन आलेल्या या मालिकेला प्रेक्षकांनी देखील खूप चांगला प्रतिसाद दिला. अशातच मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी दीपा म्हणजेच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिचा एक व्हिडिओ समोर आला आहे. 

रेश्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ती ‘हवा मैं उडती जाये’ या गाण्यावर डान्स करत आहे. ती या ट्रेण्डिंग गाण्यावरील डान्स स्टेप्स फॉलो करताना दिसत आहे. तिने लाल आणि पांढऱ्या रंगाचा लेहंगा घातला आहे. तिचा हा डान्स व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. (Actress reshma shinde’s dance video viral on social media)

तिचे अनेक चाहते या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्याने “झक्कास,” अशी कमेंट केली आहे. तसेच आणखी एका चाहत्याने “क्या बात है,” अशी कमेंट केली आहे.

मालिकेत रेशमा शिंदे आणि आशुतोष गोखले हे मुख्य भूमिकेत आहेत. या व्यतिरिक्त हर्षदा खानविलकर, अनघा भागरे, अंबर गणपुळे हे कलाकार आहेत. रेश्माने या आधी ‘लगोरी’, ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘केशरी नंदन’ या मालिकानमध्ये काम केले आहे. परंतु तिचे ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा नावाचे पात्र चांगलेच गाजले आहे. अनेकांना तिचे हे पात्र खूप आवडत आहे.

हेही वाचा :

अशाप्रकारे शूट झाला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतील रोमॅंटिक सीन शूट, प्रार्थनाने केला व्हिडिओ शेअर

नवीन घराच्या बाल्कनीमध्ये रोमॅंटिक झाले कॅटरिना आणि विकी, शेअर केला क्युट फोटो

लग्नानंतर अंकिता लोखंडेने शेअर केला गृह्प्रवेशाचा व्हिडिओ, पत्नीची साडी सांभाळताना दिसला विकी 

 

 

हे देखील वाचा