बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा बऱ्याच काळापासून अली फजल सोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या दोघांच्या प्रेमाबद्दल चाहत्यांना खूप उत्सुकता असते. दोघांचे फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. पण तुम्हाला रिचाच्या पहिल्या प्रेमाबद्दल माहिती आहे का? हे प्रेम कदाचित खाजगी नसेल, पण हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी रिचाचे नक्कीच हे पहिले प्रेम होते.
हे होते पहिले प्रेम
सुपरस्टार शाहरुख खानबद्दल बोलताना त्याला बॉलिवूडचा राजा म्हटले जाते. त्याचे चाहते दिवसेंदिवस सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओला लाईक्स करत असतात. त्याच अनुषंगाने शाहरुख खानच्या एका चाहत्याला सोशल मिडीयावर त्याच्या कॉलेजच्या दिवसांचा फोटो सापडला. तेव्हा त्याने तो बाकीच्या चाहत्यांसोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला आणि ट्विटरवर ही शेअर केला.
शाहरुख खानचे शालेय दिवसातील फोटो
या फोटोमध्ये शाहरुख खान उर्वरित शाळकरी मुलांसह पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. हा फोटो शेअर करताना चाहत्याने लिहिलं आहे की, “शाळेतील एक विचित्र मुलगा दिवसा मुंबईवर राज्य करण्याचे स्वप्न बघत असतो. हे एक असं मॉर्निंग फॉरवर्ड आहे, ज्यासाठी मी कधीच तक्रार करणार नाही.” रिचा चड्ढाने ट्विटरवर व्हायरल होत असलेल्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे.
First love
— RichaChadha (@RichaChadha) July 28, 2021
बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढाने तिच्या ट्विटर अकाउंटवरुन या फोटोवर रिट्वीट केले आहे. रिचाने लिहिले की, ‘माझे पहिले प्रेम’. रिचाच्या या ट्वीटवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यापैकी एका चाहत्याने लिहिलं आहे की, “मला वाटलं राहुल द्रविड हे तुमचं पहिलं प्रेम आहे.” तर “शाहरुख खान हा राहुल द्रविडच्या अगोदर आहे.” असे उत्तर रिचाने दिलं.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क’, लाल साडीत खुललं आर्चीचं सौंदर्य; फोटोमधील लूकने चाहत्यांना पाडली भुरळ
-रणवीर सिंग का घालतो ‘असे’ कपडे? अभिनेत्याने स्वत: सांगितले त्याच्या अतरंगी फॅशन सेन्समागचे कारण










