Wednesday, June 25, 2025
Home मराठी ‘सुरमई अखियों में’, म्हणत रिंकूने सादर केला पारंपारिक साज, लखलखणाऱ्या फोटोंचा इंटरनेटवर धुराळा

‘सुरमई अखियों में’, म्हणत रिंकूने सादर केला पारंपारिक साज, लखलखणाऱ्या फोटोंचा इंटरनेटवर धुराळा

देशभरात दिवाळी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे. सध्या दिवाळी सुरू असल्याने सर्वजण चमकताना दिसत आहेत. दिवाळीची तयारी काही दिवस आधीपासून केली जाते. आपल्याला दिवाळीला कोणत्या स्टाईलचे कपडे घालयाचे आहेत, त्यावर कोणती ज्वेलरी घालायची, यासाठी आधीपासूनच तयारी केली जाते. दिवाळी हा असा सण आहे, ज्यामुळे सर्वजण एकत्र येतात आणि सण साजरा करतात. दिवाळीच्या निमित्ताने अनेक कलाकार आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत आहेत. अशातच आता मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरुचे दिवाळी स्पेशल फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

आतापर्यंत अनेक कलाकारांनी आपले दिवाळीचे खास फोटो शेअर केले आहेत. मात्र, नुकतेच आता रिंकू राजगुरुने तिचे दिवाळीतील खास फोटो शेअर करून चाहत्यांच्या काळजाचा ठोकाच चुकवला आहे. रिंकू सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबारोबर शेअर करत असते. चाहते देखील तिच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

रिंकूने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोत तिने लाल रंगाच्या साडीसह सोनेरी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. तिने दागिने आणि मेकअपसह तिचा पारंपारिक लूक पूर्ण केला आहे. ज्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे.

रिंकूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने वेगवेगळ्या पोझ दिल्या आहेत. एका फोटोत ती बसलेली दिसत आहे, तर दुसऱ्या फोटोत ती हातात मोठी समई घेऊन दिव्याचा प्रकाश उभी राहिलेली दिसत आहे. तिच्या या फोटोंनी सोशल मीडियावर दिव्यांच्या प्रकाशाप्रमाणे लखलखाट निर्माण केला आहे. तिने हे फोटो शेअर करताना सुंदर असे कॅप्शन देखील लिहले आहे. “सुरमई अखियों में” असे लिहित लाल रंगाचा हार्ट इमोजी देखील शेअर केला आहे.

रिंकूच्या या फोटोंना चाहते जोरदार पसंती देत आहेत. तिच्या या पोस्टला कमेंट करत चाहते तिला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. इतकेच नव्हे, तर तिच्या या पोस्टवर कलाकार देखील प्रतिक्रिया देत आहेत. अभिनेता आकाश ठोसरने देखील तिच्या या पोस्टला इमोजी शेअर करून प्रतिक्रिया दिली आहे. आतापर्यंत तिच्या या पोस्टला २१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा