Thursday, September 28, 2023

रुबीना दिलैक मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज; पंजाबी चित्रपटांमध्ये पदार्पण करणार टीव्हीची ‘किन्नर सून’

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडमध्ये एकापेक्षा एक भन्नाट चित्रपट येत आहेत. त्यामध्ये अनेक नवनवीन चेहरे बघायला मिळत आहेत. अशातच आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक मोठ्या पडद्यावर अगमन करणार आहे. रुबीनाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतता वर्ग आहे. रुबीनाचे चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. आता रुबीनाच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.

आपल्या दमदार अभिनय आणि कौशल्यामुळे रुबीनाने (Rubina Dilaik) प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. रुबिना बऱ्याच दिवसांपासून टीव्ही स्क्रीनवरून गायब असली तरी तिचे चाहते तिच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली असून रुबिना लवकरच एका नव्या प्रोजेक्टसह दमदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. खरंतर रुबिना लवकरच गायक आणि अभिनेता इंदर चहलसोबत पंजाबी फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, रुबिना पंजाबी चित्रपटात पदार्पण करणार आहे. पंजाबी इंडस्ट्रीत रुबिनाच्या पदार्पणाबद्दल चाहते खूप उत्सुक आहेत. हिमाचलची रहिवासी असलेल्या रुबीनाने एका मुलाखतीत सांगितले की, “हिमाचल आणि पंजाब ही दोन्ही राज्य आहेत, आमच्या घरी नेहमीच पंजाबी कुटुंबे येत असतात. त्यामुळे मला ही भाषा समजणे खूप सोप आहे. तसेच, मी लग्न देखील एका पंंजाब मुलाशी झाल आहे. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टी आधिच समजल्या आहेत.

अभिनव शुक्ला आणि रुबिना यांना पंजाबी चित्रपट खूप आवडतात. रुबिना म्हणाली, “आम्ही दोघेही जवळपास प्रत्येक पंजाबी चित्रपट पाहतो. पंजाबी इंडस्ट्रीतील लोक शूट आणि स्क्रिप्टमध्ये खरोखर चांगले काम करत आहे. पंजाबी संगीत आणि भांगड्यावर संपूर्ण जग नाचते,” असेही ती म्हणाली.

रुबीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, झी टीव्ही शो ‘छोटी बहू’मध्ये अविनाश सचदेव विरुद्ध राधिका शास्त्रीची भूमिका साकारून अभिनेत्री प्रसिद्धी मिळवली. यानंतर अभिनेत्री ‘ सास बिना ससुराल’ , ‘पुनर विवाह – एक नई उमेद’, ‘शक्ती – अस्तित्व के एहसास की’, ‘देवों के देव…महादेव’ सारख्या लोकप्रिय शोमध्ये झळकली होती. (Actress Rubina Dilaik will debut in Punjabi films)

अधिक वाचा- 
राणी मुखर्जीचा धक्कादायक खुलासा! 2020मध्ये झालेल्या गर्भपाताविषयी म्हणाली, ‘5 महिन्यांच्या प्रेग्नंसी…’
दिशा पटानीनंतर टायगर पुन्हा दिशा नावाच्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये? म्हणाला, ‘मी मागील 2 वर्षांपासून…’

हे देखील वाचा