Monday, December 9, 2024
Home मराठी मोठी बातमी! अभिनेत्री रुबीना दिलैकचा अपघात; अभिनेत्री गंभीररित्या जखमी

मोठी बातमी! अभिनेत्री रुबीना दिलैकचा अपघात; अभिनेत्री गंभीररित्या जखमी

टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो बिग बॉसच्या माध्यमातून अभिनेत्री रुबीना दिलैकने घराघरात प्रसिद्धी मिळवली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी रुबीना सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. रुबीनाच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. रुबीनाचा अपघात झाला आहे.

रुबीनाचा (rubina dilaik) पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाने तिच्या अपघाताबद्दल सोशल मीडियावर माहिती दिली आहे. अभिनवने एक ट्विट केले आहे. त्याने ट्विट करताना लिहीले की, “आमच्या बाबतीत फार वाईट घडले आहे, चुकून तुमच्या बाबतीत देखील घडू शकते. फोनवर बोलत असताना ट्रॅफिक लाइट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. याबाबत अधिक माहिती लवकरच शेअर करेल. रुबिना गाडीच्या आत बसलेली होती. त्यामुळे तिला फार काही झालेले नाही. सध्या ती ठिक आहे. तिच्यावर सध्या औषध उपचार सुरू आहेत.”

त्यानंतर अभिनवने मुंबई पोलिसांना तात्काळ दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.त्याचवेळी मुंबई पोलिसांनी त्याच्या ट्विटला प्रतिउत्तर दिले आहे. ते म्हणाले की, ‘ज्या ठिकाणी घटना घडली आहे. त्या परिसरातील जवळच्या पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती द्या.’

रुबीनाचे चाहते चिंतेत पडले आहेत. ती लवकर बरी व्हावी म्हणून चाहते देवाकडे प्रार्थना करत आहेत. अनेक चाहते अभिनवने केलेल्या ट्विटला रिप्लाय देत आहेत. एका चाहत्याने लिहीले की, “लवकर बरी हो रुबीना.” तर दुसऱ्याने लिहीले की, “रुबीना ठिक आहे का? आम्हाला वेळोवेळी अपडेट कळवा.” तसेच आणखी एकाने म्हटले की, “कृपया रुबीची आणि स्वतःची काळजी घ्या.. आशा आहे की सर्वकाही लवकर ठीक होईल.” (Actress Rubina Dilaik’s terrible accident was informed by her husband Abhinav Shukla)

अधिक वाचा –
फक्त सिद्धू मुसेवालाच नाही ‘या’ 5 कलाकारांची तरही हत्या, एक होता धर्मेंद्रचा भाऊ. सिद्धू मूस वाला वाढदिवस
अभिनेते जॅकी श्रॉफ पत्नीची लाखोंची फसवणूक भांडणाचा दावा, गुन्हा, प्रकरण खूप गंभीर

 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा