Thursday, June 13, 2024

अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या पत्नीची लाखोंची फसवणूक झाल्याचा दावा, गुन्हा दाखल, प्रकरण खुपच गंभीर

बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांच्या पत्नी, निर्मात्या आयशा श्रॉफ यांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. आयशा श्रॉफ यांनी आपल्याला 58.53 लाखाचा गंडा घातला गेल्याचा दावा केला आहे. यांसादर्भात त्यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे. ( tiger shroff mom ayesha shroff cheated of rs 58 lakh case files )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयेशा यांची 58.53 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल आहे. या प्रकरणी एलन फर्नांडिस याच्याविरुद्ध सांताक्रूझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 408, 420, 465, 467, 468 आणि 471 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा – माेठी बातमी! दाक्षिणात्य प्रसिद्ध अभिनेत्याचे कार अपघातात निधन, दारूच्या नशेच चालवत हाेता गाडी

एलन फर्नांडिसने टायगर श्रॉफच्या ‘एमएमए मॅट्रीक्स’ या कंपनीत घोटाळा केल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘एमएमए मॅट्रीक्स’ ही टायगरची जीम कंपनी आहे. या कंपनीमध्ये 20 नोव्हेंबर 2018 रोजी डायरेक्टर ऑफ ऑपरेशन म्हणून एलनची नियुक्ती केली गेली. टायगर आपल्या कामांमध्ये व्यस्त असल्याने त्याची आई आयेशा या कंपनीचा सर्व कारभार पाहते. एलन फर्नांडिस याला ‘एमएमए मट्रीक्स’मध्ये येणाऱ्या लोकांना मार्षल आर्टचे प्रशिक्षण देण्याकरीता ठेवले होते.

अधिक वाचा –
– मिका सिंगने राखीला जबरदस्तीनं किस केलं अन् राडा झाला, मॅटर थेट पोलिसांपर्यंत गेलेला । मिका सिंगचा वाढदिवस
– लहान असताना तेजस्वी प्रकाशने केलाय बॉडी शेमिंगचा सामना, स्वतःच सांगितलेला ‘तो’ वाईट अनुभव । वाढदिवस विशेष

हे देखील वाचा