टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस’च्या माध्यमातून अभिनेत्री रुबीना दिलैकला खुप लोकप्रियता मिळाली. तिने ‘छोटी बहू‘ या मालिकेतून राधिका नावाच्या भूमिकेतून स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे अभिनयीसोबतच रुबीना सोशल मीडिवारही नेहमीच सक्रिय असते. रुबीना सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते.
रुबीनाने (Rubina Dilaik) नुकताच एक व्हिडिओ तिच्या अधिकृत अकाउंटवरून शेअर केला आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी वेगवेगळा अंदाज वर्तवण्यास सुरूवात केली आहे. अनेक जण रुबीना गर्भवती असल्याचे म्हणत आहे. या व्हिडिओमध्ये रूबीना वेगवेगळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.
रुबीनाने एक फोटो देखील पोस्ट केला आहे. पोस्ट शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, “पोस्ट केली नाही तर, गोंधळ उडेल.” तिच्या या पोस्टवर कमेंटचा वर्षाव होत आहे. रुबीनाचे इन्स्टाग्रामवर 9 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर नजर टाकली तर ती वेगवेगळ्या पोस्ट टाकत असल्याचे दिसचते.
या व्हिडिवर कमेंंट करताना एका युजरने लिहिले की, “तू गरोदर आहेस का?” दुसऱ्याने लिहिले की, “अभिनंदन.” तर आनखी एकाने लिहिल की,”उद्यापासून तुमचे शूट सुरू होण्याची वाट पाहत आहे.” तिच्या या व्हिडिओला 26हजाराहून अधिक लाइक आल्या आहे.
View this post on Instagram
नुकतीच या आगोदर एक पोस्ट शेअर करून तिने दवाखान्यातून घरी आल्याचे सांगितले. रुबीना विषयी बोलायच झाले तर, तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. ती ‘छोटी बहू’, ‘ससुराल सिमर का’, ‘शक्ती : आस्तित्व के एहसास की’, ‘सास बिना ससुराल’, ‘इश्क में मरजावा’ या मालिकांमध्ये देखील झळकली होती. (Actress Rubina Dilaik’s video goes vira)
अधिक वाचा-
–सुनील ग्रोवर करतोय आर्थिक संकटाचा सामना ? रत्यावर भाजतोय मक्याचे कणीस; पाहा व्हिडिओ
–‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वारियरचे हटके फोटोशूट