Monday, September 25, 2023

सुनील ग्रोवर करतोय आर्थिक संकटाचा सामना ? रत्यावर भाजतोय मक्याचे कणीस; पाहा व्हिडिओ

छोट्या पडद्यावर ‘गुत्थी’ बनून लोकांना खळखळून हसवणारा अभिनेता सुनील ग्रोवर वेगवेगळ्या करणांमुळे चर्चेत असतो. तो अनेकदा आपल्या फनी स्टाइलमुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवताना दिसतो. सुनीलने त्याच्या काॅमेडिच्या बळावर प्रेक्षकांच्या हृदयात स्वतःची एक वेगळी जागा निर्माण केली आहे. लोकप्रिय कॉमेडियन सुनील प्रेक्षकांना हसवण्याची एकही संधी सोडत नाही. अलीकडेच सुनीलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

खरंतर सुनील ग्रोव्हर (sunil grover) याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. खरं तर, सुनील ग्रोव्हर मकेच कणीस भाजताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर फेरीवाल्याच्या गाडीत बसलेला दिसत आहे. तिथे बसुन तो कणीस भाजत आहे. व्हिडिओमध्ये, सुनील ग्रोव्हर डोक्यावर टॉवेल बांधून बसला आहे. हा व्हिडिओ शेअर करत सुनील ग्रोव्हरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “मी नवीन मिशनच्या शोधात आहे.”

त्याच्या या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “तू काय करतोस, कणीस भाजत आहेस का?” दुसऱ्याने लिहिले की, “तुमचा नवीन प्रोजेक्ट केव्हा येणार आहे, आम्ही तुमच्या परत येण्याची वाट पाहत आहोत.” सुनीलबद्दल एका चाहत्याने लिहिले की, “तुम्हाला कपिल शर्मा शो आवडत नसेल तर शोमध्ये येऊ नका, पण यूट्यूबवर तुमचा व्हिडिओ शेअर करा.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover)

सुनील ग्राेव्हरच्या वर्कफ्रंट बद्दल सांगायच झाले, तर ताे अखेरचा ‘गुडबाय’ या चित्रपटात पंडितजींच्या भूमिकेत झळकला होता. 45 वर्षीय सुनील ग्रोवरला खरी ओळख ‘द कपिल शर्मा शो’मधून मिळाली आहे. याव्यतिरिक्त त्याने ‘गब्बर इज बॅक’, ‘द लिजेंड ऑफ भगत सिंग’ आणि ‘भारत’ यांसारख्या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. आता तो ‘जवान’ चित्रपटात दिसणार आहे. (The video of ‘The Kapil Sharma Shae’ star Sunil Grover roasting maize on Rata has gone viral on social media.)

अधिक वाचा- 
ओटीटीवरील सेक्स व हिंसा या विषयांवरील वेब सीरिजबद्दल मधुराणीने केला खुलासा; म्हणाली,’माझं डोकं…’
विसाव्या वर्षी साकारला ८० वर्षांचा म्हातारा, दिलीप साहेबांवरील प्रेमाखातर मनोज यांनी बदलले स्वत:चे नाव

हे देखील वाचा