साध्या भोळ्या पोशाखात दिसणाऱ्या अनुपमाने पुन्हा एकदा दाखवला ग्लॅमरस अंदाज, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात


टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिकांमध्ये ‘अनुपमा’ या मालिकेचाही समावेश होतो. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारी अभिनेत्री रुपाली गांगुली ही देखील चांगलीच प्रसिद्ध आहे. तिने अनुपमा हे पात्र निभावून अनेक प्रेक्षकांच्या मनात तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. ही मालिका मोठ्या संख्येने पाहिली जाते. तसेच टीआरपीच्या स्पर्धेत देखील मालिका टॉपला आहे. मालिकेत साध्या पोशाखात दिसणारी अनुपमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचा वेगवेगळा ग्लॅमरस अंदाज ती प्रेक्षकांना नेहमीच दाखवत असते. अशातच तिने पुन्हा एकदा तिचा ग्लॅमरस अंदाज दाखवला आहे. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर शेअर केलेला फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

रुपालीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिने स्ट्रॅपलेस टॉप घातला आहे. तसेच तिने तिचे सगळे केस मोकळे सोडले आहेत. तसेच यावर तिने लाईट मेकअप करून तिचा लूक पूर्ण केला आहे. यासोबतच ती गोड स्माईल देत आहे. या फोटोत ती इतकी सुंदर दिसत आहे की, तिच्यावरून नजर हटवने कोणालाही कठीण होईल. (Actress rupali ganguli share her glamorous photos on social media)

हा फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “स्वप्न, पंख आणि डोळे एकच गोष्ट सांगत असतात. तुम्ही कोणती गोष्ट शिकली आहे?” तिच्या या फोटोवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन तिच्या या ग्लॅमरस लूकचे कौतुक करत आहेत. याआधी देखील तिने तिच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले होते. या फोटोत ती एन्जॉय करताना दिसत होती.

रुपाली गांगुलीने २०१३ मध्ये आश्विन वर्मासोबत लग्न केले होते. आश्विन एका क्रिएटिव्ह कंपनीचा मालक आहे. त्यांना रुद्रांक्ष नावाचा एक मुलगा आहे. ती अनेकवेळा तिच्या कुटुंबासोबत फोटो शेअर करत असते. तसेच तिचा भाऊ देखील एक नामांकित फोटोग्राफर आहे.

‘अनुपमा’ सोबतच रुपालीने ‘साराभाई वर्सेस साराभाई’, ‘बा बहु और बेबी’, ‘बिग बॉस १’, ‘खतरों के खिलाडी’ यांसारख्या अनेक शोमध्ये काम केले आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. ती एक नावाजलेली अभिनेत्री आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दादा, तू माझे जग आहे’, म्हणत बॉबी देओलने बहिणींसोबतचा फोटो पोस्ट करत सनीला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

-‘बीच बॉम्ब’ मीरा राजपूतने शेअर केला तिचा ग्लॅमरस, मादक बिकिनी फोटो

-कार्तिक आर्यन नेटफ्लिक्सवर करणार जबरदस्त ‘धमाका’, ट्रेलर पाहून तुमच्याही अंगावर येतील शहारे


Leave A Reply

Your email address will not be published.