लाल टिकली, नाकात नथ अन् बोटात मोठी अंगठी घालून रुपालीच्या झक्कास पोझ, पाहून तुम्हीही व्हाल घायाळ


‘अनुपमा’ ही मालिका जवळपास आता सर्वांच्या परिचयाची झाली असेल, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण, या मालिकेत काम करणाऱ्या प्रत्येक पात्राने आपल्या अभिनयाने भूमिकेत जीव ओतला आहे. मात्र, या सर्वांमध्ये यातील एका पात्राने सर्वांचे लक्ष वेधले आहे, ते म्हणजे अभिनेत्री रुपाली गांगुली होय. या मालिकेत रुपाली ‘अनुपमा’ ही भूमिका निभावते. आपल्या अभिनयाव्यतिरिक्त रुपाली तिच्या सोशल मीडिया पोस्टसाठीही ओळखली जाते. ती आपले नवनवीन फोटो आणि व्हिडिओ नेहमीच चाहत्यांसाठी शेअर करत असते. अशातच तिने शेअर केलेल्या साडीतील फोटोंनी सर्वांना भुरळ घातली आहे.

नुकतेच ४४ वर्षीय रुपालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अभिनेत्रीने गुलाबी रंगाची साडी नेसल्याचे दिसत आहे. यासोबतच अभिनेत्रीचा पारंपारिक लूक चाहत्यांना घायाळ करत आहे. (Actress Rupali Ganguly Was Seen Giving A Beautiful Pose In A Pink Saree)

शेअर केलेल्या या फोटोंमध्ये रुपाली गडद गुलाबी रंगाच्या साडीत दिसत आहे. कपाळावर लाल टिकली, हातात लाल बांगड्या, नाकात नथ आणि बोटात मोठी अंगठी घालून ती भन्नाट पोझ देताना दिसत आहे.. तसेच, तिची हेअरस्टाईलही नेहमीच्या तुलनेत थोडी वेगळी दिसली. हलके कुरळे असलेले तिचे मोकळे केस, तिला आणखी आकर्षक बनवत आहेत.

रुपालीच्या या हटके स्टाईलवर तिचे चाहते पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. अभिनेत्रीची हे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. त्याचवेळी चाहते रुपालीच्या या फोटोंवर सतत कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. रुपालीच्या या फोटोंना आतापर्यंत २ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. हे फोटो पाहून असे म्हणता येईल की, रील लाईफपेक्षा अनुपमा म्हणजेच रुपाली खऱ्या आयुष्यात खूपच स्टायलिश आहे.

रुपाली अनेकदा तिचे कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असते. पूर्वी बालदिनानिमित्त तिने आपल्या मुलाला आणि लोकांच्या मनात लपलेल्या  लहान मुलाला या दिवशी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचवेळी, दिवाळीलाही रुपालीने फुलांची रांगोळी काढतानाचा व्हिडिओ शेअर केला होता.

रुपाली अनेकदा सोशल मीडियावर तिची फॅशनेबल स्टाईल दाखवते. ती कधी वेस्टर्न, तर कधी भारतीय पोशाखांमधली तिच्या लूकमुळे चर्चेत असते. त्याचवेळी अनुपमा या शोबद्दल बोलायचे झाले, तर या मालिकेने सलग अनेक आठवडे टीआरपीच्या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. शोमधील सध्याचा ट्रॅक प्रेक्षकांना आवडत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-मीनाक्षी शेषाद्रींनी वाढदिवसानिमित्त फोटो केला शेअर, वयाच्या ५८ व्या वर्षीही दिसतात खूपच सुंदर

-‘राम सेतू’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षय कुमारला आली आईची आठवण, व्हिडिओ पाहून तुमचेही पाणावतील डोळे

-मेहुणा आयुष शर्माला सलमान खानसोबत ‘अंतिम: द फायनल ट्रुथ’मध्ये करायचे नव्हते काम, केला खुलासा


Latest Post

error: Content is protected !!