अभिनेत्री ऋतुजा बागवेची सुंदरता अशी की, पाहून चाहताही म्हणाला, ‘दीपिका पदुकोणचे मराठी व्हर्जन’

सोशल मीडिया हा कलाकारांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. त्यांच्या चाहत्यांशी जोडून राहण्यासाठी कलाकार नेहमीच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. यात ऋतुजा बागवे ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तिचे अनेक ग्लॅमरस तसेच पारंपारिक लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

ऋतुजाने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने लाल रंगाचा सुंदर असा शॉर्ट ड्रेस घातला आहे आणि पायात पांढऱ्या रंगाचे शूज घातले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, ऋतुजाने केस मोकळे सोडले आहेत आणि कानात मोठे रिंग्स घातले आहेत. नेहमीच साडीमध्ये दिसणारी ऋतुजा या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. (Actress Rutuja bagwe share her morden look photos on social media)

तिचा हा फोटो नेहमीप्रमाणेच तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. तिच्या एका चाहत्याने या फोटोवर कमेंट केली आहे की, “दीपिका पदुकोणचे मराठी व्हर्जन.” तसेच बाकी अनेकजण या फोटोवर हार्ट ईमोजी पोस्ट करत आहेत.

ऋतुजाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने २००८ मध्ये ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमध्ये सहाय्यक भूमिका साकारून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. पुढे तिने ‘स्वामिनी’, ‘मंगळसूत्र’, ’एका लग्नाची तिसरी गोष्ट’ अशा काही मालिकांमध्ये सहाय्यक भूमिका साकारल्या.

यानंतर ऋतुजाने ‘तू माझा सांगती’ आणि ‘नांदा सौख्य भरे’मध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. तसेच तिने ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत देखील सुबोध भावेसोबत काम केले आहे. याशिवाय तिने ‘रिस्पेक्ट’ आणि ‘शहीद भाई कोतवाल’ या चित्रपटांमध्येही काम केले आहे. सध्या ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे खूप चर्चेत असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पुकार’ चित्रपटाला ३८ वर्षे पूर्ण; शूटिंगदरम्यान करीनाने अमिताभ यांचे पाय धरून केली होती ‘ही’ विनवणी

-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत

-अभिनेता आयुषमन खुरानाचा लाडका भाऊ; प्रत्येक अभिनयात ‘अपारशक्ती’ लावून बनलाय बॉलिवूडचा टायमिंग किंग

Latest Post