Tuesday, April 23, 2024

सई ताम्हणकर स्पेनमध्ये फिरतेय ‘या’ व्यक्तीसोबत; दोघांचा खास फोटो तुफान व्हायरल…

मराठी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या यादी अभिनेत्री सई ताम्हनकरचे नाव घेतले जाते. तिने तिच्या सौंदर्याच्या आणि अभिनयाच्या जोरावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर सईने बाॅलिवूड चित्रपटांमध्ये देखील आपली झलक दाखवली आहे. सई सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

सई (Sai Tamhankar) सोशल मीडियावर तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सईचा सोशल मीडियावर प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. सईने केल्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. सईची प्रत्येक पोस्ट चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरत असते. सई तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करते. त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. सई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील नेहमी चर्चेत येते.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सई ताम्हनकरचे नाव निर्माता अनिश जोगसोबत जोडले गेले आहे. सई अनिशला डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे. ते दोघे अनेदा एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मात्र, अद्यापही त्या दोघांनी त्यांच्या नात्याची कबुली देलेली नाही. पण सध्या सई आणि अनिश रिलेशनशिपमध्ये आहेत, या चर्चेला जोर धरला आहे. सध्या सई स्पेनमध्ये फूल धमाल मस्ती करताना दिसत आहे.

नुकतेच अभिनेत्री सईने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिने तिचे फोटो तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकांऊटवरुन शेअर केले आहेत. फोटो पाहून सई एकटीच स्पेनमध्ये फिरायला गेली असल्याचे वाटत आहे. पण तसं अजिबात नाही. सई आणि अनिश दोघेही फिरायला गेले आहे. सई आणि अनिशने अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sai (@saietamhankar)

 सई आणि अनिशचा स्पेनमधील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ते दोघे एंजॉय करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या फोटोवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. या फोटोवर चाहते भन्नाट कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका युजरने लिहीले की, ‘येताना मला iPhone 14 घेऊन ये.. आल्यावर मी कॅश देतो.’

सई ताम्हणकर विषयी बोलायचं झालं तर, कृती सेननच्या ‘मिमी’ या सिनेमात तिच्या व्यक्तिरेखेचे प्रचंड कौतुक झाले. तिच्या या भूमिकेसाठी तिला आयफा आणि फिल्मफेयरचा पुरस्कार देखील मिळाला आहे. तिने हिंदीमध्ये ‘हंटर’ या चित्रपटात काम केले आहे. ‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्ह स्टोरी’, ‘वजनदार’, ‘क्लासमेट’ यांसारखे सुपरहिट चित्रपटात सईने काम केले आहे. (Actress Sai Tamhankar and Anish Jog’s photos are going viral on social media)

अधिक वाचा- 
‘आदिपुरुष’मधील डायलाॅगवरुन होणाऱ्या टीकेवर तेजस्विनी पंडितने सोडल मौन, म्हणाली, “वाद निर्माण करण्यासाठी…”
अभिनेत्री प्राजक्ताच्या माळीच्या लूकने चाहते घायाळ; फोटोवर कौतुकांचा वर्षाव

हे देखील वाचा