Thursday, April 3, 2025
Home मराठी सई ताम्हणकरने सिनेसृष्टीबद्दल केला धक्कादायक खुलासा, ‘या’ गोष्टी केल्या उघड

सई ताम्हणकरने सिनेसृष्टीबद्दल केला धक्कादायक खुलासा, ‘या’ गोष्टी केल्या उघड

सई ताम्हणकर (Sai Tamhankar) ही मराठी आणि हिंदी चित्रपटक्षेत्रातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या कसदार अभिनयाने आणि सौंदर्याने सईने आपली वेगळी ओळख निर्णाण केली आहे. आपल्या चित्रपटांइतकीच सई सोशल मीडियावरील हॉट आणि बोल्डलूकमुळेही कायम चर्चेत असते. काही दिवसांपुर्वी तिने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून चाहत्यांशी संवाद साधला होता. यावेळी सईने अनेक गंभीर विषयांवर चर्चा केली होती. यामध्ये तिने चित्रपट जगतातील अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासाही केला. 

मराठी चित्रपट जगतातील बोल्ड आणि बिंधास्त अभिनेत्रींमध्ये सई ताम्हणकरच्या नावाचा प्रामुख्याने समावेश केला जातो. ती नेहमीच विविध विषयांवर आपले परखड मत मांडताना दिसत असते. काही दिवसांपूर्वी सईने सोशल मीडिया अकाउंटवरून आपल्या चाहत्यांशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. यावेळी तिने चाहत्यांनी विचारलेल्या अनेक गंभीर प्रश्नांची उत्तरे दिली होती.

या चर्चेमध्ये एका चाहत्याने सईला, “चित्रपट क्षेत्रात स्त्री पुरूष असा भेदभाव न करता समान काम आणि मानधन मिळते का?” असा प्रश्न केला होता. यावर उत्तर देताना सईने, चित्रपट जगतात मानधनाच्या बाबतीत स्त्री- पुरूष असा भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जातो, तसेच काम मिळतानाही स्त्री- पुरूष असा भेदभाव केला जात असल्याचे सांगितले. मात्र आता ओटीटीमुळे यावर खूप प्रभाव पडल्याची कबुलीही तिने दिली.

या चर्चेत आणखी एका चाहत्याने सईला, “तु यश- अपयशाला कशा प्रकारे सामोरे जातेस?” असा प्रश्न केला होता. यावर बोलताना सईने म्हणाली की, “मी जितक्या आनंदाने माझ्या यशाचा आनंद व्यक्त करते, त्याचप्रमाणे मी माझ्या चुकांचाही अभ्यास करते आणि त्यामधून शिकते.” याबद्दल पुढे बोलताना सईने आपल्या चाहत्यांना सल्ला दिला की, “आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस वेगळा असतो, यावेळी आपण स्वतःवर विश्वास ठेवणे गरजेचे असते.”

दरम्यान फक्त मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपट जगतातही सईच्या नावाची आणि अभिनयाची चर्चा होत असते. तिने ‘दुनियादारी’ चित्रपटात केलेल्या डॅशिंग भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले होते. अलिकडेच तिची स्वप्निल जोशीसोबतची (Swapnil Joshi) ‘समांतर’ वेबसिरीजही चांगलीच गाजली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा