Friday, April 26, 2024

RRR | सर्वात महागड्या चित्रपटासाठी आलिया भट्ट, राम चरणने घेतली ‘इतकी’ फी; बजेट ऐकून चक्रावेल डोकं

भारतीय चित्रपट निर्माते एसएस राजामौली सध्या त्यांच्या आगामी ‘आरआरआर’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगण (Ajay Devgan), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) यांसारख्या दिग्गज कलाकारांनी सजलेला ‘आरआरआर’ या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चित्रपटाच्या प्रमोशन आणि प्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, ‘आरआरआर’च्या बजेटबाबत चकित करणारी बातमी समोर आली आहे. ‘आरआरआर’ हा आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे.

एसएस राजामौली यांच्या ‘आरआरआर’चे बजेट ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली – द कन्क्लुजन’ पेक्षा जास्त सांगितले जात आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले, तर हा विक्रम सध्या अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रजनीकांत (Rajinikanth) यांच्या ‘२.०’ चित्रपटाच्या नावावर आहे. ज्याचे बजेट सुमारे ४५० कोटी रुपये होते. ‘आरआरआर’च्या बजेटबाबत अधिकृत पुष्टी अद्याप प्रलंबित आहे.

माध्यमांतील वृत्तानुसार, आंध्र प्रदेशचे मंत्री पेरनी नानी यांनी सांगितले की, “आम्हाला ‘आरआरआर’च्या निर्मात्यांकडून एक अर्ज आला आहे. या माहितीनुसार, निर्मात्याने ‘आरआरआर’वर ३३६ कोटी रुपयांचे बजेट खर्च केले आहे. या रकमेत जीएसटी आणि कलाकारांच्या फीचा समावेश नाही. आता हा अर्ज मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर चित्रपटाच्या तिकिटांच्या किमतीबाबत निर्णय घेतला जाणार आहे.”

माध्यमांतील वृत्तानुसार, जर एकट्या चित्रपटाच्या निर्मितीसाठी ३३६ कोटी रुपये खर्च केले गेले असतील, तर याचा अर्थ ‘आरआरआर’ बनवण्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च झाले असतील. कारण यात आलिया भट्ट, अजय देवगन , ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांसारख्या कलाकारांच्या फीचा समावेश केला गेला नाही, असे सांगितले जात आहे. जर प्रमोशनचा खर्च आणि क्रू सदस्यांसह प्रत्येकाची फी जोडली गेली तर याचे बजेट सर्वाधिक होऊ शकते.

राम चरण आणि जूनियर एनटीआर यांनी ‘आरआरआर’साठी ४५ कोटींची मोठी फी वसूल केली आहे. तर आलिया भट्टने ९ कोटी आणि अजय देवगणने २५ कोटींना हा चित्रपट साइन केला आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, एसएस राजामौली यांना फी म्हणून ‘आरआरआर’ कडून ३० टक्के नफा मिळेल.

माध्यमांतील वृत्तानुसार, ‘बाहुबली द कन्क्लूजन’ २५० कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. ज्यामध्ये राजामौलीने २८ कोटी, प्रभासने २५ कोटी आणि राणा दग्गुबतीने १५ कोटी चार्ज केले होते. याचा अर्थ एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा त्यांच्या चित्रपटांपैकी सर्वात महागडा चित्रपट आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा