Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड करीनाला पती सैफकडून मिळाले ‘हे’ खास गिफ्ट; अभिनेत्री म्हणाली ‘अशा पतीवर प्रेम करा…’

करीनाला पती सैफकडून मिळाले ‘हे’ खास गिफ्ट; अभिनेत्री म्हणाली ‘अशा पतीवर प्रेम करा…’

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan)  यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. लग्नापूर्वी आणि लग्नानंतरही हे जोडपे एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग अवलंबतात. अलिकडेच सैफने पत्नी करीनाला सर्वोत्तम गिफ्ट दिले आहे, जे पाहून अभिनेत्रीचे डोळे पाणावले आहेत.

खरं तर सैफने करीनाला ब्लू पंप हील्स गिफ्ट केले आहेत. हे हील्स करीनाला खूप आवडले असून, तिने चाहत्यांसोबत याचा फोटो शेअर केला आहे. इंस्टाग्राम स्टोरीवर तिच्या पंप हील्सचा फोटो शेअर करत तिने सैफसाठी एक रोमँटिक नोट लिहिली, “जेव्हा तुमचा पती तुम्हाला सर्वोत्तम पेयर भेट म्हणून देतो, तेव्हा त्या पतीवर खूप प्रेम करा.” बायकोला तिची आवडती वस्तू मिळाली की, नवऱ्यावर प्रेमाचा वर्षाव होतो हे नक्कीच असते. हे हील्स घातलेला एक फोटो करीनाने शेअर केला आहे. (saif ali khan gifts wife kareena kapoor blue pump heels actress showers love)

Kareena-Kapoor
Photo Courtesy Instagramkareenakapoorkhan

फुटवेअरची शौकीन असलेल्या करीनासाठी यापेक्षा चांगली भेट कोणती असू शकते! सैफ आणि करीना दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात. काही काळापूर्वी दोघांनी मालदीवमध्ये फॅमिली व्हेकेशन एन्जॉय केले. एकदा सैफच्या वाढदिवशी आणि दुसऱ्यांदा करीनाच्या वाढदिवसाला. करीनाने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते, जे तिच्या ड्रीम हॉलिडेचे सौंदर्य वर्णन करण्यासाठी पुरेसे होते.

‘हे’ आहेत दोघांचे आगामी चित्रपट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर करीना कपूरचा चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती आमिर खानसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. दुसरीकडे, सैफ अली खानचा चित्रपट ‘बंटी और बबली २’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये त्याने पुन्हा एकदा राणी मुखर्जीसोबत पडद्यावर धमाल केली. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘आदिपुरुष’ आणि ‘विक्रम वेध’ यांचा समावेश आहे.

हेही नक्की वाचा –

हे देखील वाचा