Wednesday, July 3, 2024

समंथाने नागा चैतन्यच्या पहिल्या पत्नीबद्दल केला खुलासा, अभिनेत्री म्हणाली, ‘मी किस केल्यावर तो…’

दाक्षिणात्य चित्रपटांची अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा नागा चैतन्यपासून घटस्फोट झाल्यापासून ती सतत चर्चेत होती. घटस्फोटापूर्वी समंथा आणि नागा चैतन्य हे दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील एक परिपूर्ण जोडपे होते. या कलाकारांच्या घटस्फोटाने चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. नागा चैतन्य आणि समंथा रुथ प्रभू यांच्या घटस्फोटाच्या धक्क्यातून चाहते अजून बाहेर आले नव्हते की, तर आता या अभिनेत्याला पहिली पत्नीही असल्याचे समोर आले आहे. होय… समंथाने स्वतः एका मुलाखतीदरम्यान नागा चैतन्यच्या पहिल्या पत्नीबद्दल खुलासा केला होता. समांथाने सांगितले होते की, जेव्हाही ती नागासोबत रोमँटिक होऊ लागते तेव्हा त्याची पहिली पत्नी मध्ये येत होती.

समंथाने (Samantha Ruth Prabhu) २०१९ मध्ये लक्ष्मी मंचू टॉक शोमध्ये नागा चैतन्यच्या (Naga Chaitanya) पहिल्या पत्नीबद्दल सांगितले होते. समंथाने तिच्या आणि नागा चैतन्यच्या वैवाहिक जीवनाचे रहस्य उघड केले आणि सांगितले की, टाकिया ही नागाची पहिली पत्नी आहे. जर तिने त्याला किस केली, तर त्यांच्यामध्ये उशी असते. समंथा तिचे बोलणे येथे संपवत टॉक शोमध्ये म्हणाली होती की, “मला वाटते मी बरेच काही बोलली आहे.”

समंथा रुथ प्रभू सध्या ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘ओ अंट मावा’ या गाण्यासाठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. या गाण्यातील अभिनेत्रीच्या बोल्ड अभिनयाने चाहत्यांना वेड लावले आहे. हे या चित्रपटाचे हिट गाणे आहे. या गाण्याच्या माध्यमातून समंथा पहिल्यांदाच आयटम नंबर करताना दिसली आहे. त्यासाठी तिने मोठी रक्कमही घेतली आहे.

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर समंथा रुथ प्रभूच्या आगामी चित्रपटांच्या बकेटमध्ये अनेक मोठे चित्रपट आहेत. ‘शकुंतलम’ आणि ‘कथू वकुला रेंदू काधल’ या चित्रपटात नयनतारा आणि विजय सेतुपतीसोबत समंथा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. दुसरीकडे, नागा चैतन्य आगामी चित्रपटाच्या वर्कफ्रंटवर नजर टाकल्यास अभिनेता लवकरच करीना कपूर खान आणि आमिर खान यांच्यासोबत ‘लाल सिंग चड्ढा’ या बॉलिवूड चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा –

नोरा फतेही बीचवर माशासारखी दिसली फिरताना, व्हिडिओ पाहून अभिनेत्रीच्या अदेवर तुम्हीही व्हाल फिदा

जॉन अब्राहमला मिळाले ‘फोर्स’ फ्रँचायझीचे हक्क, लवकरच ‘फोर्स ३’ची तयारी करणार सुरू

तब्बल ४० वर्षांनंतर परेश रावल करणार गुजराती चित्रपटात काम, ‘डिअर फादर’च्या ट्रेलरने घातला धुमाकूळ

 

हे देखील वाचा