Saturday, August 2, 2025
Home साऊथ सिनेमा ‘विश्वास बसत नव्हता…’, म्हणत सामंथाने सांगितले तिच्या घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल

‘विश्वास बसत नव्हता…’, म्हणत सामंथाने सांगितले तिच्या घटस्फोटानंतरच्या आयुष्याबद्दल

‘अभिनेत्री समंथा (Samantha) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी लग्नाला ४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली होती. ही बातमी ऐकून दोघांच्या चाहत्यांना धक्काच बसला. कारण दोघांचीही चाहत्यांच्या आवडत्या जोडप्यांमध्ये त्यांची गणना होत होती. मात्र, इतके दिवस दोघेही घटस्फोटावर मौन बाळगून होते. घटस्फोटाचे कारण जाणून घेण्यासाठी चाहतेही वाट पाहत होते. कारण अचानक घटस्फोटाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता. पण नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत समांथाचे शब्द ऐकून ती लवकरच आयुष्यात पुढे जाईल असे वाटते.

समंथा म्हणाली की, “समस्या सोडवण्याआधी ती स्वीकारणे आवश्यक आहे, एकदा तुम्ही समोरची समस्या स्वीकारली की, अर्धे काम असेच होते.” ती म्हणाली की, जर लोकं तुमची परिस्थिती स्वीकारू शकत नसतील आणि ज्यामुळे ते तुमच्यासोबत राहू शकत नाहीत, तर ती कधीही न संपणारी लढाई बनते.”

पुढे ती म्हणाली, “सुरुवातीच्या काळात घटस्फोट घेण्याआधी मलाही वाटत होतं की, मी जगू शकणार नाही, मी मरेन, पण मी ज्या पद्धतीने जगतेय ते पाहून मला धक्काच बसला. मी पूर्वी स्वत:ला कमकुवत मानायचे. पण घटस्फोटानंतर माझ्यात बरेच बदल झाले आहेत. मला या पैलूबद्दल माहिती नव्हती.”

समंथाचा पहिला चित्रपट इतका हिट झाला की, प्रेक्षक समंथाला ओळखू लागले याची कोणालाच अपेक्षा नव्हती. पण अचानक तिला प्रेक्षकांकडून मिळालेले प्रेम समजू शकले नाही, चाहते तिच्याकडून खूप अपेक्षा करू लागले. समंथा खूश असली, तरी तिने वेगळा विचार केला, तिला वाटले की, तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ती या प्रेमास पात्र नाही. पण समंथाने लवकरच तिचा हा विचार मागे टाकला.

समंथा आणि चैतन्यने २०१७ मध्ये धूमधडाक्यात लग्न केले होते. अलीकडेच, दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करून ४ वर्षांचे नाते तोडल्याची बातमी शेअर केली होती. दोघांच्या या निर्णयामुळे चाहते निराश झाले आहेत.

हेही वाचा- 

भोजपुरी सुपरस्टार पवनसिंगच्या आगामी गाण्याच्या टिझरचा सोशल मीडियावर धुमाकूळ, काही काळातच टिझर ट्रेंडिंगमध्ये

रस्त्यावर लोकांना थांबवून थांबवून फुलं देताना दिसला कार्तिक आर्यन, पण काय आहे कारण?

BIGG BOSS 15: राखी सावंतच्या पतीने केला मोठा खुलासा, स्वतः च्या भूतकाळाबद्दल सांगितले ‘असे’ काही

हे देखील वाचा