Thursday, March 28, 2024

समंथावर लावला नागा चैतन्यच्या अफेअरच्या बातम्या पसरवल्याचा गंभीर आरोप, अभिनेत्रीने दिले चोख उत्तर

साउथ स्टार नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांचा २०२१ मध्ये घटस्फोट झाला होता. दोघेही आपापल्या आयुष्यात पुढे गेले आहेत. त्याचवेळी नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या अफेअरच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. नागा चैतन्यची पूर्व पत्नी समंथा त्याची प्रतिमा खराब करण्यासाठी या बातम्या पसरवत असल्याचे, मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले जात होते. यावर आता अभिनेत्रीची प्रतिक्रिया समोर आली असून, तिने ट्विट करून लोकांना चोख उत्तर दिले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकतेच शोभिता नागा चैतन्यसोबत त्याच्या नवीन घरात दिसली होती. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरच्या बातम्या चर्चेत होत्या. मात्र, नागा चैतन्यची बदनामी करण्यासाठी समंथा ही बातमी पसरवत असल्याचे अहवालात म्हटले गेले. त्यामुळे नागा चैतन्य आणि त्याची टीम नाराज आहे. यावर आता समंथाची प्रतिक्रिया समोर आली आहे. (samantha ruth prabhu reaction on ex husband naga chaitanya and affair)

अभिनेत्रीने ट्वीट करून लिहिले, “मुलीबद्दल अफवा- कदाचित खरी असेल!! मुलीबद्दल अफवा- मुलीनेच पसरवली असेल!! मोठे व्हा…आम्ही दोघेही पुढे आलो आहोत…तुम्हीही पुढे जा..तुमच्या कुटुंबावर आणि कामावर लक्ष द्या…”

समंथा आणि नागा चैतन्य यांचा विवाह ६ ऑक्टोबर २०१७ रोजी गोव्यात झाला होता. लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून नागा चैतन्यपासून वेगळे झाल्याची माहिती दिली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा आणि नागा चैतन्य यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर, दोघांनीही फॅमिली कोर्टात समुपदेशन केले होते. पण, समुपदेशन करूनही समंथा आणि चैतन्यने आपला निर्णय बदलला नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा