Friday, March 31, 2023

हातावरील टॅटूमागील गोष्ट सांगत, ‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ने केला खास फोटो शेअर

कलर्स मराठी या वाहिनीवरील एका मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका म्हणजे ‘जीव माझा गुंतला.’ (Jeev Majha Guntala) मालिका पाहून आता प्रेक्षकांचाच या मालिकेत जीव गुंतला आहे. मालिकेची कहाणी एक वेगळी आणि प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारी आहे. त्यामुळे मालिकेची कहाणी सगळ्यांना भावत आहे. मालिकेत एका सामान्य घरातील मुलीची कहाणी दाखवली आहे. घरात कोणताही पुरुष नसताना ही मुलगी कॉलेज करता करता घराची जबाबदारी घेते. चार पैसे कमावता यावर म्हणून ती रिक्षा चालवते. खरंतर महिला आजकाल कोणत्याच क्षेत्रात कमी नाहीत. प्रत्येक क्षेत्रात आज त्या कार्यरत आहेत. याची एक झलक या मालिकेत दाखवली आहे.

मालिकेतील योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले मुख्य भूमिकेत आहेत. सौरभ हा सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी सक्रिय असतो. अशातच त्याने त्याच्या हातावरील टॅटूबाबत एक मोठा खुलासा सोशल मीडियावर केला आहे. (Jiv majha guntala actor saorabh chaugule share his tatoo story on social media)

सौरभने इंस्टाग्राम अकाउंटवरून एक कोलाज फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका बाजूला त्याच्या हातावरील टॅटू आहे, तर दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या वेशात एक व्यक्ती उभा आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “लोक नेहमी मला या टॅटूमागचे कारण विचारतात, म्हणून आज मी तुम्हाला सांगणार आहे. आजोबा ! माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत स्तंभांपैकी एक! तुम्ही आमच्यासोबत नसला, तरी तुमच्या शिकवणीने मला नेहमीच आधार दिला आहे. मला तुमची खरोखर आठवण येत नाही कारण, तुम्ही मला वाटलेले जीवनाचे धडे कायम माझ्यासोबत आहेत.”

त्याने पुढे लिहिले की, “जेव्हा जेव्हा माझ्याकडे कोणत्याही परिस्थितीची उत्तर नसतात, तेव्हा मी माझ्या हातावरची तुमची स्वाक्षरी (टॅटू) पाहतो आणि मला जाणवते की, तुम्ही माझा हात धरला आहे. त्याद्वारे मला मार्गदर्शन करत आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आजोबा तुमचा नातू.” त्याने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. अनेकजण त्याच्या या पोस्टवर कमेंट करत आहेत.

‘जीव माझा गुंतला’ मालिकेत सौरभ सध्या मल्हार या व्यावसायिकाची भूमिका साकारत आहे. त्याची ही भूमिका त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहेत. नुकतेच मालिकेत मल्हार आणि अंतरा यांचे लग्न झाले आहे. त्यामुळे मालिकेत येणारे ट्विस्ट देखील प्रेक्षकांना पसंत पडत आहेत.

हेही वाचा :

सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग करणार एकत्र तिसरा चित्रपट, स्कॉटलंडमध्ये झाला शूटिंगला आरंभ

नाटकाच्या रंगमंचावर झाला उमेश कामतचा वाढदिवस साजरा, व्हिडिओ शेअर करून मानले आभार!

अंकिताच्या लग्नात हळद खेळण्यासाठी अमृता खानविलकरने केले आवडत्या साडीला गुडबाय, म्हणाली…

 

 

हे देखील वाचा